PAK vs AFG: अफगाणिस्तानच्या विजयानंतर सचिनने ‘अजय जडेजा’ला केला सलाम, कारणही आहे तेवढेच खास, घ्या जाणून..

PAK vs AFG:  1996 साली अफगाणिस्तानने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने बेंगलोरचे मैदान मारले. विश्वचषक सामन्यात  काल चेन्नईमध्ये देखील पाकिस्तानचा सुफडा साफ केला. पाकिस्तानच्या या दोन्ही पराभवामध्ये सर्वात मोठा रोल होता, तो भारताचा माजी कर्णधार अजय जडेजा याचा. अफगाणिस्तानच्या विजयानंतर अजय जडेजा याची सर्वत्र चर्चा जोरदार होऊ लागली. पडद्या पाठीमागे राहून विजयाचे सूत्र देणाऱ्या जडेजा याला विजयाचे सारे श्रेय जाते. त्याबद्दल सर्वच आजी-माजी खेळाडूंनी त्याचे कौतुक केले आहे.

PAK vs AFG:   विश्वचषक 2023 साठी अफगाणिस्तानचा मेंटर आहे अजय जडेजा

PAK vs AFG

अजय जडेजा हा विश्वचषक 2023 मध्ये अफगाणिस्तानचा मेंटर म्हणून काम पाहत आहे. क्रिकेटमधील त्याचे अनुभव अफगाणिस्तानिक खेळाडूंबरोबर शेअर केले आहेत. ज्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण जगासमोर आहे. महेंद्रसिंग धोनीच्या आधी सर्वात कूल क्रिकेटर म्हणून ओळखला जाणारा अजय जडेजा याने अफगाणिस्तानी खेळाडूंना मैदानात कुल राहण्याची कला शिकवली.

PAK vs AFG: पाकिस्तान झाली उलटफेरचा शिकार; अफगाणिस्तानचा 8 गडी राखून ऐतिहासिक विजय

जडेजा एक उत्तम क्रिकेटपटू होता. त्याच्याकडे दोन विश्वचषक स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे. विश्वचषक सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळाडूंनी मैदानात मानसिक ताणतणाव न कामगिरी कशी करायची याचा मूलमंत्र दिला होता. तो त्याच्या कारकिर्दीमध्ये एक उत्तम क्षेत्ररक्षक देखील होता. सिंगल्स डबल्स मध्ये कसे कन्व्हर्ट करायचे ही कला त्याच्याकडे चांगलीच अवगत होती. हीच कला त्याने अफगाणिस्तानच्या खेळाडूंमध्ये उतरवली. त्याचा फायदा आहे अफगाणिस्तानच्या संघाला होतोय.

विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने अजय जडेजा याला संघासोबत जोडले. जडेजा हा भारतीय संघाचा कर्णधार होता. भारतातल्या कंडिशन आणि खेळपट्टीबाबत त्याला चांगली माहिती होती. याचाच फायदा अफगाणिस्तानच्या संघाला व्हावा म्हणून अफगाणिस्तानने जडेजाची मेंटर म्हणून नियुक्ती केली.

विश्वचषकाच्या सुरुवातीला अफगाणिस्ताने इंग्लंड सारख्या बलाढ्य देशाचा पराभव केला. या विजयाचा शिल्पकार देखील अजय जडेजाच होता. पडद्या पाठीमागे राहून अफगाणिस्तानच्या विजयाची आकृती तयार करणाऱ्या जडेजाने देखील पाकिस्तानला पराभूत करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. अफगाणिस्तानने पाकिस्तानचा केलेला पराभव हा दीर्घकाळ लक्षात राहण्यासारखा आहे.

PAK vs AFG: अफगाणिस्तानच्या विजयानंतर सचिनने 'अजय जडेजा'ला केला सलाम, कारणही आहे तेवढेच खास, घ्या जाणून..

अफगाणिस्तानच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरने लगेच ट्विटरवरून अफगाणिस्तानला व अजय जडेजा याला शुभेच्छा देत कौतुक केले. त्याने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले की, या विश्वचषकात अफगाणिस्तानची कामगिरी अप्रतिम आहे. त्याची फलंदाजीची शिस्त आणि त्याने दाखवलेला स्वभाव उत्कृष्ट आहे. रनींग बिटवीन द विकेट पाहून त्यांची मेहनत लक्षात येते.

यानंतर सचिन तेंडुलकर विनोदी पद्धतीने लिहिले कि हे सर्व काही अजय जडेजाच्या प्रभावामुळे असू शकते. एक मजबूत बॉलिंग लाइनअपसह, इंग्लंड आणि पाकिस्तान सारख्या संघांवर त्यांच्या मिळवलेला विजय हा अफगाणिस्तानचा नवीन संघ उदयास येण्याचे संकेत दिले. सचिन तेंडुलकरचे हे ट्विट प्रचंड वायरल होत आहे.


हेही वाचा: