PAK vs AUS:वॉर्नर झुकेगा नही साला…! पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत डेव्हिड वॉर्नरने ठोकले शानदार शतक, वादावरही केले ईशार्यातून भाष्य , पहा व्हिडीओ..

डेव्हिड वॉर्नर

PAK vs AUS,डेव्हिड वॉर्नर: ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (PAK vs AUS) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची ही शेवटची कसोटी मालिका आहे. यानंतर वॉर्नर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.

पर्थ कसोटीच्या पहिल्याच दिवशी डेव्हिड वॉर्नरचा धडाकेबाज फॉर्म पाहायला मिळाला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी डेव्हिड वॉर्नरने शानदार शतक झळकावले. पहिल्या डावात 164 धावा करून वॉर्नर बाद झाला. या खेळीने वॉर्नरने टीकाकारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

डेव्हिड वॉर्नर

शतक झळकावल्यानंतर वॉर्नरने हातवारे केले,व्हिडीओ व्हायरल.

सामन्यात शतक झळकावल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन केले. यानंतर त्याने ओठांवर बोट ठेवून ‘खामोश’ हावभाव केले. त्यानंतर चाहते वॉर्नरचा हावभाव ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनशी जोडत आहेत.

खरे तर या मालिकेपूर्वी मिचेल जॉन्सनने डेव्हिड वॉर्नरबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. कारण या मालिकेतील शेवटच्या सामन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नरला शानदार निरोप देण्याची तयारी करत आहे. ज्यावर मिशेल जॉन्सनने आक्षेप घेतला होता.

सामन्याच्या चहापानाच्या वेळी डेव्हिड वॉर्नर म्हणाला की खूप छान वाटतं, गोलंदाजांसाठी धावा जमवणं हे सगळं आहे. टीकाकारांना गप्प करण्याचा यापेक्षा चांगला मार्ग नाही. डेव्हिड वॉर्नरने शतक झळकावल्यानंतर त्याची पत्नी कॅंडिसने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये कॅंडिसने डेव्हिड वॉर्नरचा फोटो सायलेंट इमोजीसह शेअर केला आहे. त्यांची ही पोस्ट सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

PAK vs AUS 1ST TEST MATCH  OVERVIEW: असी आहे सामन्याची स्थिती.

पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 5 गडी गमावून 364 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नरने 164 धावा, उस्मान ख्वाजाने 41 धावा, ट्रॅव्हिस हेडने 40 आणि स्टीव्ह स्मिथने 31 धावा केल्या.

याशिवाय पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना आमेर जलालने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर शाहीन शाह आफ्रिदीने एक विकेट घेतली. सध्या ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श आणि अॅलेक्स कॅरी 15 आणि 14 धावांवर नाबाद आहेत.

पहा व्हिडीओ,


हेही वाचा:

Taapsee Pannu Affair: अभिनेत्री तापसी पन्नूचे आहे या खेळाडूसोबत अफेअर, पहिल्यांदाच खुलेपणाने बोलत म्हणाली, ‘त्याच्यासोबतच्या नात्याचा अभिमान’

IPL 2024 Auction: स्मिथ किंवा पॅट कमिन्स नाही तर लिलावात ‘या’ खेळाडूवर लागू शकते आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत मोठी बोली, आजवरचा सर्वांत महागडा खेळाडू ठरणे निच्छित..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *