PAK vs BAN live : पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना 21 ऑगस्ट पासून रावळपिंडीमध्ये खेळवला जात आहे. पहिल्याच दिवशी मोहम्मद रिझवानने पाकिस्तानसाठी जोरदार फलंदाजी केली आणि रावळपिंडी कसोटीत शतक झळकावले. बांगलादेशविरुद्ध रिझवानने शानदार खेळी केली आहे. शतक झळकावल्यानंतर त्याने खास पद्धतीने सेलिब्रेशन केले. रिजवानने मैदानात गुडघ्यावर बसून अल्लाचे आभार मानले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने रिझवानचा व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे. रिझवानसोबत सौद शकीलनेही शतक झळकावले. त्याची खेळीही संघासाठी महत्त्वाची होती.
पाकिस्तानकडून रिझवान सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या काळात त्याने दमदार कामगिरी करत शतक झळकावले. वृत्त लिहिपर्यंत रिझवानने दीडशेहून अधिक धावा केल्या होत्या. शतक झळकावल्यानंतर त्याने खास पद्धतीने अल्लाहचे आभार मानले. त्याने जमिनीवर गुडघे टेकले आणि मग आभार मानले. पीसीबीने त्याचा व्हिडिओही शेअर केला आहे.
वृत्त लिहेपर्यंत पाकिस्तानने पहिल्या डावात 104 षटकात 5 गडी गमावून 393 धावा केल्या होत्या. यावेळी मोहम्मद रिजवान 216 चेंडूत 152 धावा करून खेळत होता. रिझवानने या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार मारले. सौद शकीलने त्याच्यासोबत 200 हून अधिक धावांची भागीदारी केली. यादरम्यान शकीलने 261 चेंडूत 141 धावा केल्या. शकीलने या खेळीत 9 चौकार मारले. या दोघांनी पाकिस्तानसाठी शानदार पुनरागमन केले. याआधी सॅम अयुबने अर्धशतक झळकावले होते.
या सामन्यात पाकिस्तानची सुरुवात खराब झाली होती. अवघ्या 16 धावांच्या स्कोअरवर त्याने 3 विकेट गमावल्या होत्या. अब्दुल्ला शफीक 2 धावा करून बाद झाला. शान मसूद 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. बाबर आझम शून्यावर बाद झाला. अयुबने 56 धावांची खेळी केली.
हे ही वाचा:
- IND vs IRE Live Streaming: विश्वचषकातील टीम इंडियाचा पहिला सामना आज, पहा कधी? कुठे किती वाजता सुरु होणार पहिला सामना…!
- BIG UPSET: विश्वचषकात अमेरिकेने पाकिस्तान संघाचा केला पराभव, लज्जास्पद कामगिरीमुळे भडकला बाबर आझम, केले मोठे वक्तवय..