PAK vs BAN Live: पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान आपल्या कारकिर्दीत दररोज नवनवे विक्रम करताना दिसतोय. बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी रिझवानने शानदार फलंदाजी करत पाकिस्तानला संकटातून सोडवले. रिझवानने केवळ शतकच केले नाही तर आता 150 धावांचा टप्पाही पार केला आहे. यासह त्याने एक नवा इतिहासदेखील रचला आहे.
15 वर्षांनंतर 150 धावांचा टप्पा पार करणारा मोहम्मद रिजवान ठरला पहिला पाकिस्तानी यष्टीरक्षक!
कसोटी क्रिकेटमध्ये 150 धावांचा टप्पा ओलांडणारा मोहम्मद रिझवान 2009 नंतर पाकिस्तानचा पहिला यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. यापूर्वी पाकिस्तानचा यष्टिरक्षक कामरान अकमलने २१ फेब्रुवारी २००९ रोजी श्रीलंकेविरुद्ध कराची येथे १५८ धावांची नाबाद खेळी खेळली होती.
First Pakistan wicket-keeper to score 1️⃣5️⃣0️⃣+ in a Test innings since 2009 🤩
Superb stuff from @iMRizwanPak 💫#PAKvBAN | #TestOnHai pic.twitter.com/egOqGkeCus
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 22, 2024
रिझवान आता द्विशतकाकडे वाटचाल करत आहे. आतापर्यंत त्याने आपल्या शानदार खेळीत 11 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत. बांगलादेशच्या गोलंदाजांना त्यांना चकमा देणे कठीण जात आहे. रिझवाननेही सौद शकीलसोबत शानदार भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी 240 धावांची भागीदारी केली. ज्यामध्ये सौद आणि रिझवानच्या शानदार शतकांचा समावेश होता. मात्र, शानदार फलंदाजी करणारा शकील हसन मिराझचा बळी ठरला आणि 95 व्या षटकात बाद झाला. त्याने 261 चेंडूत 9 चौकार मारत 141 धावा केल्या.
मोहम्मद रिजवान आधी तस्लीम आरिफच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला होता.
पाकिस्तानसाठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून कसोटी डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तस्लीम आरिफच्या नावावर आहे. अरिफने 6 मार्च 1980 रोजी फैसलाबाद येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 210 धावांची नाबाद खेळी खेळली होती. त्याचप्रमाणे इम्तियाज अहमदच्या नावावर 209 धावांचा विक्रम आहे. 1955 मध्ये लाहोरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने या धावा केल्या होत्या. या प्रकरणात रिझवान तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. लवकरच तो द्विशतक झळकावून नवा विक्रम रचू शकतो. रिझवानने 232 पेक्षा जास्त धावा केल्या तर तो यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक धावा करणारा जगातील पहिला यष्टीरक्षक बनेल. सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम झिम्बाब्वेचा माजी फलंदाज अँडी फ्लॉवरच्या नावावर आहे. ज्याने 2000 मध्ये नागपुरात भारताविरुद्ध 232 धावांची नाबाद इनिंग खेळली होती.
हे ही वाचा:
- IND vs IRE Live Streaming: विश्वचषकातील टीम इंडियाचा पहिला सामना आज, पहा कधी? कुठे किती वाजता सुरु होणार पहिला सामना…!
- BIG UPSET: विश्वचषकात अमेरिकेने पाकिस्तान संघाचा केला पराभव, लज्जास्पद कामगिरीमुळे भडकला बाबर आझम, केले मोठे वक्तवय..