PAK vs BAN Test Live: इतिहास रचण्यापासून बाबर आझम केवळ एक पाउल दूर, विराट-रोहितच्या निघणार पुढे..

0
6
PAK vs BAN Test Live: इतिहास रचण्यापासून बाबर आझम केवळ एक पाउल दूर, विराट-रोहितच्या निघणार पुढे..

PAK vs BAN Test Live:  पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम (Babar Azam) दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर क्रिकेटच्या मैदानात परतत आहे. बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत तो शान मसूदच्या नेतृत्वाखालील संघाचा भाग असेल. रावळपिंडीत 21 ऑगस्टपासून पहिली कसोटी सुरू होईल. बाबर आझमचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याला मोठा विक्रम करण्याची संधी असेल. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी इतिहास रचू शकतो. नक्की कोणता आहे हा विक्रम जाणून घेऊया सविस्तर..!

BIG UPSET: विश्वचषकात अमेरिकेने पाकिस्तान संघाचा केला पराभव, लज्जास्पद कामगिरीमुळे भडकला बाबर आझम, केले मोठे वक्तवय..

PAK vs BAN Test Live: बाबर आझमचा आंतरराष्ट्रीय विक्रम!

बाबरने पाकिस्तानसाठी आतापर्यंत 52 कसोटी सामने खेळले असून यादरम्यान त्याने 45.86 च्या सरासरीने 3898 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 9 शतके आणि 26 अर्धशतके आहेत. बाबरने 117 एकदिवसीय सामन्यांमध्ये 56.72 च्या सरासरीने 5729 धावा केल्या आहेत. टी-20 मध्येही त्याची बॅट चांगली खेळली आहे. त्याने 123 सामन्यात 4145 धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये त्याची सरासरी ४१.०४ आहे.

PAK vs BAN पहिल्या टेस्टमध्ये बाबर आझमला इतिहास घडवण्याची संधी!

या मालिकेदरम्यान बाबर आझमला विशेष कामगिरी करण्याची संधी आहे. जर त्याने पहिल्या कसोटी सामन्यात 102 धावा केल्या तर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि T20) 4000-4000 धावा करणारा तो पाकिस्तानचा पहिला फलंदाज ठरेल. पाकिस्तानी संघासाठी आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाने अशी कामगिरी केलेली नाही. जर आपण एकूण विक्रमाबद्दल बोललो तर, बाबर असे करणारा जगातील तिसरा फलंदाज ठरेल. त्याच्या आधी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी ही कामगिरी केली आहे.

PAK vs BAN Test Live: इतिहास रचण्यापासून बाबर आझम केवळ एक पाउल दूर, विराट-रोहितच्या निघणार पुढे..

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने 2022 साली T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ही कामगिरी केली होती. विराटच्या काही काळानंतर रोहित शर्माने हे स्थान गाठले होते. त्याने यंदाच्या T20 विश्वचषकादरम्यान आयर्लंडविरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 4 हजार धावा पूर्ण केल्या.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here