PAK vs BAN Test Series: पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 21 ऑगस्ट रोजी रावळपिंडीच्या मैदानावर खेळवला जाईल. या मालिकेतून पाकिस्तानला नवी सुरुवात करायची आहे. मात्र, या सामन्यापूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू आमिर जमाल जखमी झाला आहे. त्याच्या पाठीच्या भागात दुखापत झाली आहे. दुखापतीमुळे तो या मालिकेतून बाहेर आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) ही माहिती दिली आहे.
PAK vs BAN Test Series: आमिर जमाल मे महिन्यापासून दुखापतीमुळे त्रस्त
बांगलादेशविरुद्ध पाकिस्तान संघाची घोषणा झाली तेव्हा बोर्डाने आमेर जमालबाबतचा निर्णय त्याच्या फिटनेसच्या आधारे घेतला जाईल, अशी माहिती दिली होती. याआधी असे वाटत होते की तो दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघात पुनरागमन करू शकेल, परंतु या मालिकेतून तो बाहेर पडला आहे. मे महिन्यापासून तो या दुखापतीशी झुंजत होता. आमेर जमाल हा संघातील एकमेव अष्टपैलू खेळाडू होता. पीसीबीने अद्याप त्याच्या बदलीची घोषणा केलेली नाही.
आमिर जमालने या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणाच्या मालिकेतच त्याने 18 विकेट घेतल्या. याशिवाय त्याने बॅटनेही आपली ताकद दाखवून दिली.
बांगलादेश आणि पाकिस्तान (PAK vs BAN)यांच्यातील दोन्ही कसोटी सामने रावळपिंडीच्या मैदानावर होणार आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानी संघाने पूर्ण वेगवान आक्रमणासह उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांच्याशिवाय मीर हमजा, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली यांचाही संघात समावेश होऊ शकतो. तर दुसरीकडे, जमाल आता लाहोरमधील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये राहणार आहे, जिथे तो त्याच्या फिटनेसवर काम करेल.
PAK vs BAN Test Series साठी पाकिस्तानचा संघ
पाकिस्तान संघ : शान मसूद (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, मोहम्मद हुरैरा, सैम अयुब, सौद शकील, आगा सलमान, कामरान गुलाम, मोहम्मद रिझवान, सर्फराज अहमद, मीर हमजा, अबरार अहमद, मोहम्मद अली, खुर्रम शहजाद, नसीम शाह शाहीन आफ्रिदी
PAK vs BAN Test Series साठी बांगलादेश संघ
बांगलादेश संघ : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, शादमान इस्लाम, महमुदुल हसन जॉय, शकीब अल हसन, मेहदी हसन मिराज, झाकीर हसन, लिटन दास, मुशफिकुर रहीम, हसन महमूद, तस्किन अहमद, तैजुल इस्लाम, खालिद अहमद, शरीफुल इस्लाम, नाहीद राणा, नईम हसन
हेही वाचा:
- IND Vs SL 2th ODI Live:जेफ्री वँडरसेसने रचला इतिहास,एक दोन नाही तर भारताचे तब्बल एवढे खेळाडू केले बाद..
- ind vs sl Rohit sharma injured: तिसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का, कर्णधार रोहित शर्मा सरावादरम्यान जखमी, आज खेळू शकणार की नाही?