PAK vs NZ: आयसीसी विश्वचषक 2023 (World Cup 2023) चा 35 वा सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात बेंगळुरू येथे खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि किवी संघाने प्रथम फलंदाजी करताना 401 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानी फलंदाजानीही शानदार फलंदाजी केली आणि सलामीवीर फखर जमानने शतक झळकावत विश्वविक्रम आपल्या नावावर केला. या सामन्यात युवा खेळाडू रचिन रवींद्रनेही ब्लॅककॅप्ससाठी शतक झळकावले.
PAK vs NZ: सलामीवीर फखर जमानने ठोकले झंझावती शतक..
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि पहिली विकेट 6 धावांवर गमावली पण कर्णधार बाबर आझम आणि फखर यांनी मिळून डाव सांभाळला. जमानने उत्कृष्ट खेळी खेळली आणि विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानसाठी सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम आपल्या नावे केला. त्याने अवघ्या 63 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 6 चौकार आणि 9 षटकार आले. त्याचा स्ट्राईक रेटही दीडशेहून अधिक होता.
याआधी पाकिस्तानसाठी वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम माजी फलंदाज इम्रान नझीरच्या नावावर होता, ज्यांनी २००७ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ९५ चेंडूत शतक पूर्ण केले होते. आता फखरने तो विक्रम आपल्या नावावर केला असून अवघ्या 63 चेंडूत शतक ठोकले आहे. जमानने आपल्या संघासाठी आतापर्यंत 81 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 46 पेक्षा जास्त सरासरीने 3450 हून अधिक धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 11 शतके आणि 16 अर्धशतके केली आहेत.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.
- अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी