ODI Records: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात नऊ षटकात 100 धावा दिल्या होत्या. हे काही पाकिस्तानच्या गोलंदाजांसाठी नवीन नाहीये. अशी धुलाई याआधी ही अनेक पाकिस्तानी गोलंदाजांची झालेली आहे. आजच्या या विशेष लेखामध्ये पाकिस्तानसाठी वनडेमध्ये सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांविषयी माहिती जाणून घेऊया.
या गोलंदाजांची विरोधी संघातील फलंदाजांनी एवढी कुटाई केली होती की, एका स्पेलमध्ये त्यांना सर्वांत जास्त धावा पडण्याच्या विक्रम यादीत स्थान मिळालेय. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते गोलंदाज ज्यांनी एकदिवशीय क्रिकेटमध्ये पाकिस्तन कडून गोलंदाजी करतांना सर्वांत जास्त धावा दिल्यात.
ODI Records: या 5 पाकिस्तानी गोलंदाजांना एकदिवशीय क्रिकेटमध्ये पडल्यात सर्वाधिक धावा…!
1.वहाब रियाझ
पाकिस्तानचा स्ट्राईक गोलंदाज बहाव रियाझ सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजाच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 30 ऑगस्ट 2016 रोजी नॉटिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध दहा षटकांत 110 धावा दिल्या होत्या. या काळात त्याची इकोनोमी 11 धावा प्रति षटक होती तर त्याला एकही विकेट मिळाली नाही. या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 169 धावांनी पराभव केला. त्याची ही कामगिरी आजवरच्या कोणत्याही पाकिस्तानी गोलंदाजापेक्षा जास्त सुमार होती..
- Most Wickets in Test: या 5 भारतीय गोलंदाजांनी घेतलेत कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स, यादीमध्ये एक माजी कर्णधारही सामील..!
२.हसन अली
26 जानेवारी 2017 रोजी पाकिस्तानचा 22 वर्षीय वेगवान गोलंदाज हसन अलीने ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नऊ षटकांत 100 धावा दिल्या होत्या. यादरम्यान त्याने प्रति षटक ११.११ धावा देत दोन विकेट घेतल्या. या सामन्यात कांगारू संघाने पाकिस्तानचा ५७ धावांच्या फरकाने पराभव केला होता.
३.वहाब रियाझ
पाकिस्तानसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज पुन्हा वहाब रियाझ आहे, जो आधीच पहिल्या स्थानावर आहे. त्याने 17 मार्च 2013 रोजी जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दहा षटकांत 93 धावा देऊन दोन विकेट घेतल्या होत्या. या काळात रियाझने प्रति षटक ९.३० धावा केल्या होत्या. पाकिस्तान संघ हा सामना 34 धावांनी गमावला होता.
४.बिलावल भाटी
25 वर्षीय पाकिस्तानी वेगवान गोलंदाज बिलावल भाटी हा देखील अशा पाकिस्तानी गोलंदाजांपैकी एक आहे ज्याने त्यांच्या षटकांच्या कोट्यात जास्त धावा खर्च करण्याचा विक्रम केला आहे. भाटीने 3 फेब्रुवारी 2015 रोजी नेपियर येथे न्यूझीलंडविरुद्ध 9.30 धावा प्रति षटक या दराने दहा षटकांत 93 धावा केल्या. तर त्याला एकही विकेट घेता आली नाही. या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 119 धावांनी पराभव केला होता.
५.नावेद-उल-हसन
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा नावेद-उल-हसन हा पाकिस्तानचा पाचवा गोलंदाज आहे. नावेदने 4 फेब्रुवारी 2007 रोजी सेंच्युरियन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आठ षटकांत 11.50 च्या सरासरीने 92 विकेट घेतल्या. या काळात त्याने दोन विकेट्सही घेतल्या. तर दक्षिण आफ्रिकेने हा सामना 164 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता.
तर मित्रांनो हे होते ते पाकिस्तानी गोलंदाज ज्यांनी एकदिवशीय क्रिकेटमध्ये एका स्पेलमध्ये सर्वाधिक धावा दिल्या आहेत. वरील गोलंदाजांची त्यांच्या देशासाठी कारकिर्दही तेवढी विशेष असी राहिलेली नाहीये.. क्रिकेटमधील असेच रंजक विक्रम आणि माहिती जाणून घेण्यासाठी आमची वेबसाईट WWW.YUVAKATTA.IN ला नक्की भेट द्या..
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.