पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा खोडसाळपणा,आयपीएल प्ले ऑफ च्या दरम्यान आयोजित केली टी 20 मालिका; खेळाडू परतणार मायदेशी..!

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा खोडसाळपणा,आयपीएल प्ले ऑफ च्या दरम्यान आयोजित केली टी 20 मालिका; खेळाडू परतणार मायदेशी..!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

आयपीएल 2024 ला धडाकेबाज सुरुवात झाली आह. भारतात सुरू असलेल्या या स्पर्धेत पाकिस्तान सोडून जगभरातील सर्व क्रिकेट खेळणाऱ्या देशातील खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत. आयपीएल सुरू असताना एक वाईट बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आयपीएल प्ले ऑफ च्या दरम्यान एका राष्ट्रीय टी 20 मालिकेसाठी काही देशाचे खेळाडू हे मायदेशी परतणार आहेत. खेळाडू घरी परतल्याने आयपीएल मधील संघांना मोठा झटका बसू शकतो.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयपीएल प्लेऑफ सामन्या दरम्यान या टी 20 मालिकेचे आयोजन करण्यात केले आहे. त्याचा गंभीर परिणाम आयपीएलच्या सामन्यावर होऊ शकतो. भारतामध्ये आयपीएल 2024 मधील प्ले ऑफ चे सामने 21 मे ते 24 मे दरम्यान होणार आहेत. तर अंतिम सामना हा 26 मे रोजी होणार आहे. नुकतेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 22 मे ते 30 मे दरम्यान इंग्लंड विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. ही मालिका इंग्लंड मध्ये होणार आहे. आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडू या टी 20 मालिकेमध्ये खेळणार असल्याने ते मायदेशी परतू शकतात.

दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्यासाठी पीसीबीने आखली नवी योजना; पाकिस्तान क्रिकेट संघ घेणार आर्मी कडून फिटनेसचे धडे!

जूनमध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्ड आयपीएलमध्ये खेळणाऱ्या त्यांच्या खेळाडूंना मायदेशी परत बोलवू शकतो. आयपीएल प्ले ऑफ च्या सामन्यापूर्वी इंग्लंडचे काही खेळाडू मायदेशी परतू शकतात. आयपीएल सुरू होण्यापूर्वी वर्कलोड चे कारण पुढे करत इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मार्क वूड याला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परवानगी दिली नाही.

पाकिस्तानने, अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या आयसीसी विश्वचषक स्पर्धा 2024 साठी जोरदार तयारी सुरू केली आहे. स्पर्धेपूर्वी काही मालिकांचे आयोजन केले आहे. टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाला एकूण 12 t20 सामने खेळावे लागणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नुकतेच एका फिटनेस कॅम्पचे आयोजन केले आहे. सध्या पाकिस्तानचा संघ आर्मी सोबत फिटनेस कॅम्प मध्ये सराव करतोय. या फिटनेस कॅम्प मध्ये बाबर आजम, मोहम्मद रिजवान व शाहीन शहा आफ्रिदी यासारखे मोठे खेळाडू सहभागी झाले आहेत.

भारत आणि पाकिस्तानी या दोन्ही देशातील राजकीय संबंध बिघडल्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट संघातील खेळाडूंना आयपीएल मध्ये खेळण्यास बंदी घातली आहे. 2008 मध्ये पाकिस्तानचे खेळाडू आयपीएल मध्ये खेळताना दिसून आले त्यानंतर एकदाही या लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडू खेळताना दिसून आले नाहीत. त्याचा राग मनात धरत पाकिस्तानने हा खोडसाळपणा केला असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे 2005 नंतर भारत आणि पाकिस्तान या  संघात एकही द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आली नाही. त्याचाही राग पीसीबीच्या मनात आहे. पाकिस्तानचा हा खोडसाळपणा त्यांना चांगलाच महागात पडू शकतो.

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सामन्यांची मालिका वेळापत्रक..

  1. 22 मे: पहिला टी 20 सामना, लीड्स

  2. 25 मे: दुसरा टी 20 सामना, बर्मिंगहॅम

  3. 28 मे: तिसरा टी 20 सामना, कार्डीफ

  4. 30 मे: चौथा टी 20 सामना, लंडन


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…