Pakistan Team New Coach: पाकिस्तानचा क्रिकेट संघ न्यूझीलंड विरुद्ध पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेची सुरुवात 18 एप्रिल पासून होणार आहे. या टी 20 मालिकेसाठी पाकिस्तान संघासोबत कोणताही फुल टाइम प्रशिक्षक नाही. म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने निवड या मालिकेसाठी समितीचे सदस्य मोहम्मद युसुफ यांना मुख्य प्रशिक्षक आणि अब्दुल रझाक यांना सहाय्यक प्रशिक्षक पदी नियुक्ती केली आहे. हे दोघेही सध्या पाकिस्तान क्रिकेट टीम च्या निवड समितीचे सदस्य आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड दीर्घकाळासाठी वनडे आणि कसोटीसाठी वेगवेगळया विदेशी प्रशिक्षकाच्या शोधात आहे. कसोटी संघासाठी जेसन गिलेप्सी यांच्याशी संवाद सुरू आहे तर वनडे संघासाठी भारताला विश्वविजेता बनवणारे गॅरी कस्टर्न यांना प्रशिक्षक पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गॅरी सध्या आयपीएलमध्ये व्यस्त असून त्यांच्याशी बातचीत पूर्ण झाली नसल्याने प्रशिक्षक पदाचा अंतिम निर्णय घेता आला नाही. जेसन गिलेस्पी यांनी त्यांची फी आणि पाकिस्तान मध्ये राहण्या संदर्भात काही अटी ठेवल्या होत्या. त्या पीसीबीने मंजूर केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचे हे माझे दिग्गज वेगवान गोलंदाज टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर पाकिस्तान संघात बरोबर जोडले जातील. टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर पाकिस्तानचा संघ बांगलादेश इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कस्टर्न हे वनडे टीमचे प्रशिक्षक असतील. गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून उमर गुल आणि सईद अजमल यांच्या विषयी कोणताही निर्णय झाला नसला तरी ते या संघासोबत जोडले जाणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज फलंदाज गॅरी कस्टर्न आणि ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी यांना पाकिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र याची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून अधिकृत घोषणा करणे बाकी आहे.
गॅरी कस्टर्न आणि जेसन गिलेस्पी यांची नियुक्ती केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सुटकेचा विश्वास टाकला. कारण पीसीबी गेल्या तीन महिन्यापासून नव्या प्रशिक्षकाच्या शोधात होते, त्यांना आता कुठे यश मिळाले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी कोणताही विदेशी खेळाडू इच्छुक नव्हता.
पाकिस्तानचा संघ सध्या पाक आर्मी सोबत ट्रेनिंग घेत असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. बाबर आजम याच्या नेतृत्वाखाली संघ काकुल येथे आर्मी स्कूल ऑफ फिजिकल ट्रेनिंग मध्ये प्रशिक्षण घेत आहे. ते आपल्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेत आहे. पाकिस्तानचा संघ मायदेशात न्युझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी 20 मालिका 18 एप्रिल पासून खेळणार आहे.
कॅम्पसाठी निवडण्यात आलेले 29 खेळाडू
बाबर आझम, मोहम्मद रिझवान, मोहम्मद नवाज, मेहरान मुमताज, अबरार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, इरफान खान नियाझी, शादाब खान, इमाद वसीम, उसामा मीर, नसीम शाह, सईम अय्युब, फखर जमान, इफ्तिखार अहमद, अब्बास आफ्रिदी, हसन अली, मोहम्मद अली, जमान खान, साहबजादा फरहान, हसिबुल्ला, सौद शकील, उस्मान खान, मोहम्मद हरीस, सलमान अली आगा, आझम खान, मोहम्मद वसीम जूनियर, आमिर जमाल, हरिस राऊफ आणि मोहम्मद आमिर.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.