ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group
=======
pakistan Cricket Board: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पुरुषांच्या राष्ट्रीय संघासाठी विदेशी प्रशिक्षकाच्या शोधात आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन आणि वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरन सॅमी यांनी पीसीबीने दिलेला प्रशिक्षक पदाचा प्रस्ताव नाकारला आहे. सॅमी हे सध्या वेस्टइंडीज वनडे क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहेत. त्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव नाकारल्याचे सांगितले आहे.
शेन वॉटसन यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा प्रस्ताव नाकारला आहे आणि शनिवारी ते स्वदेशी परतले आहेत. क्रिकेटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कराचीमध्ये पीसीएलच्या सामन्या दरम्यान त्यांच्याशी विस्तृत अशी चर्चा झाली होती. व त्यांच्याकडे मुख्य प्रशिक्षक म्हणून प्रस्ताव देण्यात आला होता.
शेन वॉटसन यांनी सुरुवातीला प्रशिक्षक होण्यासंदर्भात स्वारस्य दाखवले होते आणि प्रस्ताव स्वीकारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मानधन मागितले होते. त्यांच्या मानधनाची रक्कम इतके जास्त होते की, ते पीसीबीला मान्य नव्हते. वॉटसन यांचा पॅकेज पाकिस्तानला परवडणारा नव्हता. त्यानंतर वॉटसन यांनी पीसीबीने दिलेला प्रस्ताव नाकारला. वॉटसन हे सध्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघासोबत सपोर्ट स्टाफमध्ये काम करत आहेत. आपल्या परिवारासोबत सिडनीमध्ये जास्त वेळ घालवता यावा हे कारण पुढे करत त्यांनी प्रशिक्षक होण्यास नकार दिला.
वॉटसन यांना पीसीबी कडून प्रतिवर्षी दोन मिलियन यु एस डॉलर मानधन इतके मानधन मिळणार होते. पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाला न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावर 14 एप्रिल पासून 5 t20 सामन्यांची मालिका खेळायचे आहे यासाठी राष्ट्रीय संघाचा कॅम्प हा 25 ते 8 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
नकवी यांनी याबाबत स्पष्ट माहिती दिले की, पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघासाठी दीर्घकाळ विदेशी प्रशिक्षकाची गरज आहे. नव्या प्रशिक्षकाचा कार्यकाल वेस्टइंडीज आणि अमेरिका येथे होणाऱ्या t20 विश्वचषक आणि त्यानंतर पुढील वर्ष होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी पर्यंत असणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला नवा प्रशिक्षक मिळाला नाही तर माजी कर्णधार युनूस खान, मोहम्मद युसुफ, इंजमाम उल- हक, मोईन खान यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.
नुकतेच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने राष्ट्रीय संघासाठी पाकिस्तानचे माजी चॅम्पियन खेळाडू अकिब जावेद यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. एकीकडे पाकिस्तानचे खेळाडू हे इतर राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होत आहेत तर दुसरीकडे पाकिस्तानचा संघ प्रशिक्षकाच्या शोधात आहे.
==
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.