पाण्यासारखा पैसा खर्च करूनही हे विदेशी खेळाडू आयपीएलमध्ये ठरले फेल; दमदार कामगिरी करण्यात भारतीय खेळाडू आघाडीवर,,

0

भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) ही सर्वात मोठे स्पर्धा सुरू आहे. देश विदेशातील हजारो खेळाडू या लीगमध्ये सहभागी होऊन आपला जलवा दाखवत आहेत. प्रत्येक संघाच्या फ्रेंचायजीने पाण्यासारखा पैसा खर्च करून खेळाडूंना आपल्या संघात सामील करून घेतले आहेत. यात काही खेळाडूंनी पैसा वसूल कामगिरी केली आहे. मात्र काही खेळाडूंना नावाला लौकिक अशीच कामगिरी करता आली नाही. दमदार कामगिरी करण्यामध्ये भारतीय खेळाडू आघाडीवर आहेत. मात्र काही असे विदेशी खेळाडू आहेत, ज्यांच्यावर कोट्यावधी रुपये खर्च करून देखील तशी कामगिरी करता आली नाही. अशा खेळाडूंना सोशल मीडियावर ठग म्हणून ट्रोल करण्यात येत आहे.

आयपीएल 2024 मध्ये अपयशी ठरलेत हे महागडे विदेशी खेळाडू.

पाण्यासारखा पैसा खर्च करूनही हे विदेशी खेळाडू आयपीएलमध्ये  ठरले फेल; दमदार कामगिरी करण्यात भारतीय खेळाडू आघाडीवर,,

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू कॅमरन ग्रीन याला आरसीबीने आयपीएल 2023च्या ऑक्शन मध्ये कोट्यावधी रुपये देऊन संघात सामील करून घेतले. आरसीबीकडून आयपीएल मध्ये खेळण्या अगोदर हा खेळाडू मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळत होता. मुंबई इंडियन्सने त्याला 17.50 कोटी रुपये देऊन संघात सामील करून घेतले होते. यंदाच्या वर्षी आरसीबीने तितकीच रक्कम देऊन आपल्या संघात त्याला स्थान दिले. यंदाच्या हंगामातील त्याची आयपीएलमधील कामगिरी ही सर्वसाधारण राहिली आहे. 3 सामन्यात त्याला केवळ 52 धावा करता आल्या तर गोलंदाजी मध्ये तो केवळ दोनच विकेट घेऊ शकला.

ऑस्ट्रेलियाचा खतरनाक वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याला केकेआरच्या संघाने 24.75 कोटी रुपये देऊन आपल्या संघात सामील करून घेतले. आयपीएलच्या इतिहासातील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला. मात्र पैशाच्या हिशोबाप्रमाणे त्याला तशी कामगिरी करता आली नाही. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही केकेआर ला समाधानकारक कामगिरी करून दाखवता आली नाही. दोन सामन्यात त्याने शंभर पेक्षा अधिक धावा देऊन एकही बळी मिळवता आला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीने धाक निर्माण केलेला हा खेळाडू आयपीएल मध्ये पूर्णपणे फेल ठरला. आयपीएल मध्ये त्याची गोलंदाजी फलंदाजांनी फोडून काढली. विशेष म्हणजे तो चार वर्षानंतर आयपीएल मध्ये खेळतोय. यापूर्वी तो आरसीबीच्या संघाकडून खेळत होता.

पाण्यासारखा पैसा खर्च करूनही हे विदेशी खेळाडू आयपीएलमध्ये ठरले फेल; दमदार कामगिरी करण्यात भारतीय खेळाडू आघाडीवर,,

न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डॅरेल मिचेल याला आयपीएलच्या लिलावात खरेदी करण्यासाठी अनेक फ्रेंचाईजी संघात स्पर्धा सुरू होती. मात्र अखेर हा खेळाडू सीएसकेच्या ताफ्यात आला. सीएसकेने त्याला 14 कोटी रुपये देऊन आपल्या संघात घेतले. कर्णधाराला आणि संघाला त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र तोही या स्पर्धेत पूर्णपणे फेल गेला. तीन सामन्यात केवळ त्याने 80 धावा केल्या असून गोलंदाजीत मात्र त्याला एकच बळी मिळवता आला.

कोट्यावधी रुपये खर्च करून देखील या खेळाडूंनी जर उर्वरित सामन्यात समाधान कामगिरी केली नाही तर संघमालक पुढील वर्षी होणाऱ्या ऑप्शन मध्ये या खेळाडूंना रिलीज करू शकतात. त्यासाठी या खेळाडूंना लवकरच आपला परफॉर्मन्स दाखवावा लागणार आहे.


===

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…

Leave A Reply

Your email address will not be published.