भारतात सध्या आयपीएल 2024 ही स्पर्धा मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहे. जगभरातील खेळाडू या लीगमध्ये सहभागी होऊन आपले कौशल्य पणाला लावत संघाच्या विजयात हातभार लावत आहेत तर दुसरीकडे पाकिस्तानचा संघ टी ट्वेंटी मालिकेच्या तयारीला लागला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ 8 वर्षानंतर आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये पाकिस्तानचा संघ आयर्लंड विरुद्ध 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील 3 टी ट्वेंटी सामन्यांची मालिका 10 मे ते 14 मे दरम्यान खेळली जाणार आहे. मालिकेतील तिन्ही सामने डब्लिन येथील कॅसल एवेन्यूच्या मैदानावर होणार आहेत. पाकिस्तानचा पाकिस्तानचा संघ 2009 मध्ये आयलँड संघाविरोध टी-20 मालिका खेळला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये एकही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. जुलै 2020 मध्ये दोन्ही संघ टी-20 मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोविडच्या कारणामुळे ही मालिका रद्द करण्यात आली.
आयर्लंड विरुद्ध पाकिस्तान T20 मालिकेचे वेळापत्रक
10 मे: पहिला T20 सामना, डब्लिन
12 मे 2रा T20 सामना, डब्लिन
14 मे: तिसरा T20 सामना, डब्लिन
पाकिस्तान क्रिकेट संघ अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा 2024 च्या तयारीला लागला आहे. खेळाडूचा फिटनेस राहावा यासाठी संघ आर्मी सोबत फिटनेसचे धडे गिरवत आहे. आयर्लंड नंतर इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध देखील टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंड विरुद्ध चार तर न्यूझीलंड विरुद्ध 5 टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे. टी 20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानच्या संघाला तयारीसाठी या मालिका खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
नुकतेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 29 जणांची शिबिरासाठी निवड केली आहे. हे 29 खेळाडू आर्मी सोबत फिटनेचे धडे गिरवत आहेत. रविवारच्या दिवशी पीसीबीने पाकिस्तान क्रिकेट संघाचा नवा कर्णधार निवडला आहे. बाबर आजम अजून पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट संघाची धुरा सांभाळणार आहे. शाहीन शहा आफ्रिदी याची कर्णधार पदावरून हाकलपट्टी करण्यात आली आहे.
तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी शोधा शोध सुरू केली आहे. मात्र त्यांना अद्यापही एकही प्रशिक्षक भेटेनासा झाला आहे. माजी खेळाडूंना ऑफर देऊन देखील हे पद स्वीकारण्यासाठी कुणीच तयार होत नाहीत. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन व वेस्टइंडीजचा सहाय्यक प्रशिक्षक सॅमी यांना प्रशिक्षक पदासाठी पीसीबीने ऑफर दिली होती. या दोघांनीही सुरुवातीला इंटरेस्ट दाखवला मात्र पुन्हा नकार दिला. आता पीसीबी न्यूझीलंडचा माजी खेळाडू ल्यूक रोंची यांना ऑफर दिली आहे.
नकवी यांनी याबाबत स्पष्ट माहिती दिले की, पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघासाठी दीर्घकाळ विदेशी प्रशिक्षकाची गरज आहे. नव्या प्रशिक्षकाचा कार्यकाल वेस्टइंडीज आणि अमेरिका येथे होणाऱ्या टी 20 विश्वचषक आणि त्यानंतर पुढील वर्ष होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी पर्यंत असणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला नवा प्रशिक्षक मिळाला नाही तर माजी कर्णधार युनूस खान, मोहम्मद युसुफ, इंजमाम उल- हक, मोईन खान यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.
===
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.