आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेमध्ये आजचा सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर सुरू आहे. या सामन्यात बांगलादेशन नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशी कर्णधाराचा हा निर्णय सलामीच्या फलंदाजांनी फेल ठरवला. त्यांची सुरुवात अत्यंत खराब झाली. नऊ धावसंख्येवर त्यांचे दोन गडी पॅव्हेलियन मध्ये परतले होते. याच दरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शहा आफ्रिदीने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 100 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.
आफ्रिदीने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने 100 विकेट घेण्याचा मिचेल स्टार्क याचा विक्रम मोडीत काढला. शंभर विकेट घेण्याचा पराक्रम अवघ्या 51 सामन्यात त्याने करून दाखवला. मिचेल स्टार्कने 100 विकेट घेण्यासाठी 52 सामने खेळले आहेत.
शाहीन शाह आफ्रिदी याने बांगलादेशचा सलामीवीर फलंदाज तंजीत हसन याला पायचित करून 100 विकेट पूर्ण केले. शाहिन शाह आफ्रिदी हा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा जावई आहे. शाहिन शाह आफ्रिदीने 2023 या वर्षापासून पाकिस्तान क्रिकेट संघाकडून खेळताना सातत्याने विकेट घेतल्या आहेत. यंदाच्या वर्षातला तो पाकिस्तानचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणारा या गोलंदाजाला विश्वचषकात इतर कोणत्याच गोलंदाजाकडून सहकार्य भेटले नाही. त्यामुळे पाकिस्तानला सलग 4 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
शाहिन शाह आफ्रिदीने 2023 विश्वचषक स्पर्धेच्या 7 सामन्यात एकूण 15 विकेट घेतल्या आहेत. 2023 च्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंची यादीत तो पाचव्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ॲडम जॅम्पा याने 7 सामन्यात 16 गडी बाद केले आहेत.
सामन्या बाबतीत बोलायचं झाले तर, आजचा सामना पाकिस्तानच्या सन्मानासाठी खूप महत्त्वाचा आहे. पाकिस्तानचा संघ यापूर्वी सेमी फायनलच्या रेस मधून बाहेर पडला आहे. परंतु त्यांचे मनोबल कायम राखण्यासाठी त्यांना आजचा विजय आवश्यक आहे. पाकिस्तानी विश्वचषक स्पर्धेत सुमार कामगिरी करून सर्वांचीच निराशा ओढावून घेतली आहे. पराभवामुळे सतत त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे.