मुलतान सुलतानचा वेगवान गोलंदाज एहसानुल्लाहने पाकिस्तान सुपर लीगमध्ये धुमाकूळ घातला आहे. एहसानुल्लाहने रविवारी कराची नॅशनल स्टेडियमवर कराची किंग्जविरुद्ध पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सादर केला. मुलतानच्या या गोलंदाजाचा सामना करण्यासाठी कराची किंग्जचे फलंदाज अडचणीचा सामना करताना दिसून आले.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज मॅथ्यू वेड देखील त्याच्या गोलंदाजीचा सामना करताना अडचणीत दिसून आला. एहसानुल्लाहने कराची किंग्जच्या डावातील वैयक्तिक चौथे आणि १९वे षटक टाकले. यादरम्यान त्याने या षटकातील एक चेंडू १५१.४ च्या गतीने टाकला. या चेंडूवर मॅथ्यू वेडने थर्डमॅनच्या दिशेने शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला चेंडू कळायच्या आत, चेंडू यष्टीला जाऊन धडकला होता. चेंडूची गती इतकी होती की, चेंडू यष्टीला लागताच यष्टी उडून दूर जाऊन पडली.
ZINNNG! 🏹
Inhsanullah is at it again! #SabSitarayHumaray l #HBLPSL8 l #KKvMS pic.twitter.com/jU113SxYri
— PakistanSuperLeague (@thePSLt20) February 26, 2023
एहसानुल्लाह पीएसएल २०२३ मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून उदयास आला आहे. त्याने ५ सामन्यात १२ बळी घेतले आहेत. स्पर्धेदरम्यान त्याची इकोनॉमी ५.५४ ची आहे तर त्याची सर्वोत्तम कामगिरी १२ धावा खर्च करत 5 विकेट्स अशी आहे. ही कामगिरी त्याने पुढेही सुरू ठेवली तर लवकरच तो मोठ्या स्पर्धेत खेळताना दिसून येऊ शकतो.