आयपीएल 2008 मध्ये पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूंना मिळाली होती सर्वात मोठी रक्कम; पहिल्या सीजन नंतर मिळाली नाही पुन्हा खेळण्याची संधी!

आयपीएल 2008 मध्ये पाकिस्तानच्या 'या' खेळाडूंना मिळाली होती सर्वात मोठी रक्कम; पहिल्या सीजन नंतर मिळाली नाही पुन्हा खेळण्याची संधी!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल ही लीग युवा खेळाडूंसाठी असा प्लॅटफॉर्म आहे, जेथे की दमदार कामगिरी करून रातोरात स्टार बनता येते. पैशासोबत प्रसिद्ध देखील मिळवता येते. यासोबतच राष्ट्रीय संघाचे दरवाजे देखील खुले होतात. कित्येक युवा क्रिकेटरनी यातून आपले करिअर बनवले. 2008 मध्ये पहिल्यांदा आयपीएल ला सुरुवात झाली. पहिल्या हंगामामध्ये पाकिस्तानी खेळाडूंनी देखील सहभाग नोंदवला होता.

IPL 2024 Schedule: अखेर आयपीएल 2024 चे वेळापत्रक समोर, आयपीएल दरम्यान होणार लोकसभेच्या निवडणुका? संभ्रम कायम..

त्यानंतर मात्र भारत आणि पाकिस्तान या देशातील राजकीय संबंध बिघडल्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी संधी मिळाली नाही. 2008 मधील आयपीएल सीझन पाकिस्तानी खेळाडूंसाठी पहिली आणि शेवटची संधी होती. लीग मधील पहिल्या हंगामात एकूण 11 पाकिस्तानी खेळाडूंनी जलवा दाखवला होता. त्यापैकी पाच खेळाडूंना सर्वाधिक रक्कम मिळाली होती. आयपीएल च्या पहिल्या सीजनमध्ये खेळलेल्या पाकिस्तानी खेळाडूंना किती रक्कम देण्यात आली याची माहिती घेऊयात.

1.शाहिद अफरीदी (Shahid Afridi)- 2.71 कोटी रुपये

 

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू शाहिद आफ्रिदी हा आयपीएल मध्ये डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळला होता. डेक्कन चार्जर्सने त्याच्यावर 2.75 कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात सामील करून घेतले. त्याने दहा सामन्यात नऊ गडी बाद केले.

आयपीएल 2008 मध्ये पाकिस्तानच्या 'या' खेळाडूंना मिळाली होती सर्वात मोठी रक्कम; पहिल्या सीजन नंतर मिळाली नाही पुन्हा खेळण्याची संधी!

2. मोहम्मद आसिफ(Mohammad Asif)- 2.61 कोटी रुपये

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफ याला आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये दिल्ली कॅपिटल्स कडून खेळण्याची संधी मिळाली. दिल्ली कॅपिटल्सने त्याला 2.61 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. IPL मध्ये सर्वाधिक कमाई मिळवणारा पाकिस्तानचा तो दुसरा खेळाडू आहे.

 

3. शोएब मलिक-(Shoaib Malik)- 2 कोटी रुपये

आयपीएल मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये शोएब मलिक हा तिसऱ्या स्थानावर आहे त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाने खरेदी करण्यासाठी दोन कोटी रुपये खर्च केले. पण त्याला नावाला लौकिक अशी कामगिरी करता आली नाही.

आयपीएल 2008 मध्ये पाकिस्तानच्या 'या' खेळाडूंना मिळाली होती सर्वात मोठी रक्कम; पहिल्या सीजन नंतर मिळाली नाही पुन्हा खेळण्याची संधी!

4. मिस्बाह उल हक( Misbah Ul Haq)- 50 .2 लाख रुपये

या यादीत चौथ्या स्थानावर मिस्बाह उल हक याचे नाव आहे. ज्याला आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये आरसीबीने 50.2 लाख रुपये देऊन आपल्या संघात सामील करून घेतले. पण मिस्बाह उल हक फेल गेला.

 

5. यूनिस खान(Younis Khan)- 90.36 लाख रुपये

आयपीएल 2008 मध्ये पाकिस्तानच्या 'या' खेळाडूंना मिळाली होती सर्वात मोठी रक्कम; पहिल्या सीजन नंतर मिळाली नाही पुन्हा खेळण्याची संधी!

पाकिस्तानच्या मधल्या फळीतील फलंदाज युनूस खान याला 90.36 लाख रुपये मिळाले. आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला होता.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

हे ही वाचा:- अखेर यशस्वी जयस्वालची व्हायरल गर्लफ्रेंड आहे तरी कोण, तिच्या सौंदर्यासमोर विराट ची अनुष्का सुद्धा फेल, बघा फोटो.

IPL 2024 : जाणून घ्या या IPL सिझन मध्ये कोणत्या संघात आहेत सर्वात धोकादायक आणि वेगवान गोलंदाज, वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *