“गरीबीमे आटा गिला..” भारताला चॅम्पियन बनवणाऱ्या प्रशिक्षकाला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर! ऑफर देऊनही कुणीच स्वीकारेना प्रशिक्षक पद..

0

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

जून 2024 मध्ये वेस्टइंडीज आणि अमेरिका येथे आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. तत्पूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हा राष्ट्रीय संघासाठी नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. पाकिस्तान संघाला पूर्ण वेळ देणारा दीर्घकाळासाठी प्रशिक्षक हवा आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विदेशी प्रशिक्षक हवा आहे. यासाठी पीसीबी अनेक माजी खेळाडूंच्या संपर्कात आहे.

विदेशी खेळाडूंना अप्रोच करून थकली पीसीबी,मानधन परवडेना.!

"गरीबीमे आटा गिला.." भारताला चॅम्पियन बनवणाऱ्या प्रशिक्षकाला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर! ऑफर देऊनही कुणीच स्वीकारेना प्रशिक्षक पद..

शेन वॉटसनने फेटाळली पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ऑफर..!

नुकतेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन आणि वेस्ट इंडिजचा वनडे संघाचा विद्यमान प्रशिक्षक डॅरन सॅमी यांना देखील प्रशिक्षक पदाची ऑफर देण्यात आली होती, मात्र दोघांनीही ती ऑफर नाकारली आहे. सुरुवातीला या दोघांनीही प्रशिक्षक होण्यासाठी उत्सुकता दाखवली. मात्र पुढे वैयक्तिक कारण पुढे करत पीसीबीची ही ऑफर साफ नाकारली. वॉटसन यांना पीसीबी कडून प्रतिवर्षी दोन मिलियन यु एस डॉलर मानधन इतके मानधन मिळणार होते.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नकवी यांनी भारताला चॅम्पियन बनवणाऱ्या प्रशिक्षकाला ऑफर दिली आहे. पीसीबीचे चेअरमन मोहसीन नकवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की,

“पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सध्या संघासाठी विदेशी कोचिंग स्टाफच्या शोधात असून नुकतेच गॅरी कर्स्टन यांच्याशी आम्ही संपर्क साधला आहे. मात्र त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद आला नाही. “2011 मध्ये भारताने गॅरी कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीसी वनडे विश्वचषक जिंकला होता.

पीसीबीने माईक हेसन जस्टिन लँगर, फिल सिमन्स, इयान मॉर्गन, मॅथ्यू हेडन यासारख्या हाय प्रोफाईल प्रशिक्षकांना ऑफर दिली आहे. मात्र यापैकी कोणीही प्रशिक्षक होण्यास स्वारस्य दाखवले नाही. पीसीबीने या प्रशिक्षकांना मोठी रक्कम देऊनही यांनी प्रशिक्षक होण्यास नकार दिला आहे.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाला न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावर 14 एप्रिल पासून 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळायचे आहे. यासाठी राष्ट्रीय संघाचा कॅम्प हा 25 ते 8 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

"गरीबीमे आटा गिला.." भारताला चॅम्पियन बनवणाऱ्या प्रशिक्षकाला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर! ऑफर देऊनही कुणीच स्वीकारेना प्रशिक्षक पद..

नकवी यांनी याबाबत स्पष्ट माहिती दिले की, पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघासाठी दीर्घकाळ विदेशी प्रशिक्षकाची गरज आहे. नव्या प्रशिक्षकाचा कार्यकाल वेस्टइंडीज आणि अमेरिका येथे होणाऱ्या टी 20 विश्वचषक आणि त्यानंतर पुढील वर्ष होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी पर्यंत असणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला नवा प्रशिक्षक मिळाला नाही तर माजी कर्णधार युनूस खान, मोहम्मद युसुफ, इंजमाम उल- हक, मोईन खान यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.

नुकतेच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने राष्ट्रीय संघासाठी पाकिस्तानचे माजी चॅम्पियन खेळाडू अकिब जावेद यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. एकीकडे पाकिस्तानचे खेळाडू हे इतर राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होत आहेत तर दुसरीकडे पाकिस्तानचा संघ प्रशिक्षकाच्या शोधात आहे.


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave A Reply

Your email address will not be published.