Pakistan Cricket Team Coach: पाकिस्तानी खेळाडूंना गुरु भेटेना, प्रशिक्षक पदाची ऑफर घेऊन पीसीबी गेली ‘या’ खेळाडूच्या दारात..!

पाकिस्तानी खेळाडूंना गुरु भेटेना, प्रशिक्षक पदाची ऑफर घेऊन पीसीबी गेली 'या' खेळाडूच्या दारात..!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

Pakistan Cricket Team Coach: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी शोधा शोध सुरू केली आहे. मात्र त्यांना अद्यापही एकही प्रशिक्षक भेटेनासा झाला आहे. माजी खेळाडूंना ऑफर देऊन देखील हे पद स्वीकारण्यासाठी कुणीच तयार होत नाहीत. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन व वेस्टइंडीजचा सहाय्यक प्रशिक्षक सॅमी यांना प्रशिक्षक (Pakistan Cricket Team Coach)पदासाठी पीसीबीने ऑफर दिली होती. या दोघांनीही सुरुवातीला इंटरेस्ट दाखवला मात्र पुन्हा नकार दिला. आता पीसीबी न्यूझीलंडचा माजी खेळाडू ल्यूक रोंची यांना ऑफर दिली आहे.

ल्यूक रोंची हे एक यष्टीरक्षक फलंदाज होते. त्यांनी न्युझीलँड कडून चार कसोटी आणि 85 वनडे आणि 33 टी 20 सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे लोकांचे हे न्युझीलँड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. सध्या ते न्यूझीलंड संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. पीसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ल्यूक रोंची यांच्याशी प्रशिक्षका संदर्भात बातचीत केली असून ल्यूक रोंची यांनी पीसीबीच्या अधिकाऱ्यांकडे विचार विनिमय करण्यासाठी वेळ मागितला आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघ नव्या प्रशिक्षकाच्या शोधात; वॉटसन-सॅमीने पीसीबीची ऑफर ठोकरली.

42 वर्षीय रोंची यांच्यासोबत पीसीबीची चर्चा सुरू आहे. पाकिस्तान सुपर लीग मध्ये ते इस्लामाबाद युनायटेड संघाचे प्रशिक्षक देखील आहेत. इस्लामाबाद युनायटेड ने याच वर्षी पाकिस्तान सुपर लीगचा किताब जिंकला होता. रोंची हे आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत होते. आक्रमक अंदाज ने फलंदाजी करणाऱ्या  या खेळाडूला आयपीएल मध्ये फारशी संधी भेटली नाही.

शेन वॉटसन यांनी सुरुवातीला प्रशिक्षक होण्यासंदर्भात स्वारस्य दाखवले होते आणि प्रस्ताव स्वीकारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मानधन मागितले होते. त्यांच्या मानधनाची रक्कम इतके जास्त होते की, ते पीसीबीला मान्य नव्हते. वॉटसन यांचा पॅकेज पाकिस्तानला परवडणारा नव्हता. त्यानंतर वॉटसन यांनी पीसीबीने दिलेला प्रस्ताव नाकारला. वॉटसन हे सध्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघासोबत सपोर्ट स्टाफमध्ये काम करत आहेत. आपल्या परिवारासोबत सिडनीमध्ये जास्त वेळ घालवता यावा हे कारण पुढे करत त्यांनी प्रशिक्षक होण्यास नकार दिला.

पाकिस्तानी खेळाडूंना गुरु भेटेना, प्रशिक्षक पदाची ऑफर घेऊन पीसीबी गेली 'या' खेळाडूच्या दारात..!

वॉटसन यांना पीसीबी कडून प्रतिवर्षी दोन मिलियन यु एस डॉलर मानधन इतके मानधन मिळणार होते. पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाला न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावर 14 एप्रिल पासून 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळायचे आहे. यासाठी राष्ट्रीय संघाचा कॅम्प हा 25 ते 8 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

नकवी यांनी याबाबत स्पष्ट माहिती दिले की, पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघासाठी दीर्घकाळ विदेशी प्रशिक्षकाची गरज आहे. नव्या प्रशिक्षकाचा कार्यकाल वेस्टइंडीज आणि अमेरिका येथे होणाऱ्या t20 विश्वचषक आणि त्यानंतर पुढील वर्ष होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी पर्यंत असणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला नवा प्रशिक्षक मिळाला नाही तर माजी कर्णधार युनूस खान, मोहम्मद युसुफ, इंजमाम उल- हक, मोईन खान यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *