झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर बाबर आझमकडून पुन्हा झाली एक मोठी चूक, सोशल मिडियावर होतोय बाबरच्या इज्जतीचा भाजीपाला..!
T20 विश्वचषकातील पाकिस्तानचा प्रवास दुःस्वप्नसारखा दिसत आहे, भारताविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतर संघाने झिम्बाब्वेविरुद्धचा दुसरा सामनाही गमावला आहे. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाला चांगलेच ट्रोल केले जात आहे.झिम्बोम्ब्वेने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानला भारतीय चाहत्यांनी सुद्धा चांगलेच ट्रोल केलंय.
एवढ कमी होत तर काय? आता खुद पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमनेही एक मोठी चूक करून स्वतः लोकांच्या निशाण्यावर आलाय. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम त्याच्या संघाच्या निर्णयांव्यतिरिक्त आता त्याच्या इंग्रजीमुळे पुन्हा एकदा ट्रोल होत आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा रस्ता खूपच कठीण दिसत आहे. अशा परिस्थितीत 2015 मध्ये केलेल्या ट्विटमुळे बाबर आझम यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. बाबर आझमने इंग्रजीत ‘वेलकम टू झिम्बाब्वे’ लिहिले पण झिम्बाब्वे लिहिण्यात त्याच्याकडून चूक झाली. अशा परिस्थितीत आता युजर्स बाबरला सोशल मीडियावर त्याच्या जुन्या ट्विटवर कमेंट करून ट्रोल करत आहेत.

Welcome zimbaway
— Babar Azam (@babarazam258) May 19, 2015
Spelling 😂
— Sameer Khan (@khan_k42604204) July 29, 2022
My idol babar is gawar
— Shivam Yadav (@ShivamY84756587) July 30, 2022
Please baber bhai tweet delete karke aap spelling correction karo please😭😭😭.main aapki trolling nahi Dekh sakti😭😭
— Kajal Thakur (@VK18Fanclub18) October 24, 2022
This is unreal man😂😂😂 thodi toh padhai kar le hoti zimbarbar bhai 😂😂😂
— Ansh (@Ayushank19) October 28, 2022
please respect Zimbabwe they own babar
— Beast (@Beast_xx_) October 28, 2022
टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. भारताने पहिल्या सामन्यात संघाचा पराभव केला आणि त्यानंतर झिम्बाब्वेकडून पराभव स्वीकारल्यानंतर त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. आता त्याला आपले उरलेले तीन सामने जिंकावेच लागतील असे नाही तर चांगल्या धावगतीसाठी मोठ्या विजयाचीही गरज आहे. यासोबतच पाकिस्तानला इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. दरम्यान, संघाचा कर्णधार बाबर आझमला ट्रोल केले जात आहे.