Featureआयपीएल 2024

रन मशीन विराट कोहलीची अशी आहे आयपीएल मधील क्रिकेट कारकीर्द! वाचा डेब्यू सामन्यात किती काढल्या होत्या धावा?

विराट कोहली आयपीएल कारकीर्द :  हजारो युवा क्रिकेटपटूंच्या गळ्यातले ताईत बनलेल्या विराट कोहलीने जगभरातले प्रत्येक मैदान आपल्या बॅटने गाजवले. प्रत्येक सामन्यागणिक त्याने विक्रमांचे मनोरे रचले आहेत. त्याची बॅट केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चालली नाही तर आयपीएलमध्ये देखील त्याचा बोलबाला राहिला आहे. 

19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत त्याने दिमाखदार कामगिरी केल्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. 2008 पासून तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा प्रमुख आधारस्तंभ आहे.

 विराट कोहलीची आयपीएल कारकीर्द!

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

आयपीएलमध्ये केकेआर संघाविरुद्ध खेळताना त्याने पदार्पण केले. मात्र पदार्पणाच्या सामन्यात त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. वेगवान गोलंदाज अशोक दिंडाच्या गोलंदाजीवर एक धावांवर बाद झाला. त्यानंतर मात्र त्याची बॅट सतत तळपत राहिली. आतापर्यंत त्याने आयपीएल मध्ये 237 सामने खेळला असून 229 च्या स्ट्राइक रेटने 7,263 धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत एकूण 234 षटकार तर 643 चौकार मारले आहेत.

35 वर्षीय विराटने 2016 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध खेळताना त्याने अवघ्या 47 चेंडूत शतक ठोकले होते. 226 स्ट्राईक रेटने खेळताना 12 चौकार आणि 8 षट्काराच्या मदतीने 143 धावांची जबरदस्त खेळी केली होती.

रन मशीन विराट कोहलीची अशी आहे आयपीएल मधील क्रिकेट कारकीर्द! वाचा डेब्यू सामन्यात किती काढल्या होत्या धावा?

2008 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचे प्रतिनिधित्व करणारा विराट 34 वेळा नाबाद राहिला आहे. मागील वर्षी त्याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळताना नितेश कुमारच्या चेंडूवर सर्वात लांब 103 मीटरचा षटकार देखील मारला होता.

रनमशीन, चेसमास्टर या नावाने प्रसिद्ध असलेल्या विराटने 2008 पासून बंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याने दीर्घकाळ या संघाचे नेतृत्वदेखील सांभाळले. पण त्याला एकदाही त्याच्या संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देता आले नाही, हे शल्य त्याच्या मनात आजही कायम आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

– आयपीएलच्या इतिहासात ऑरेंज कॅप मिळवणारा हा आहे पहिला विदेशी खेळाडू!

– एकाच मैदानावर सर्वाधिक धावा करणारी हे आहेत खेळाडू! वाचा विराटला कोणते मैदान ठरले लकी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button