आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानी बांगलादेशचा सात गडी राखून एकतर्फी पराभव केला. या विजयासह पाकिस्तानचे सेमी फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा पुन्हा पल्लवी झाल्या आहेत. पाकिस्तानने 205 धावांचे आव्हान 32.3 षटकात केवळ 3 विकेट गमावून पूर्ण केले. फखर जमान याने स्फोटक फलंदाजी करत 81 धावा काढल्या. अब्दुल शफीक यांनी 68 धावांची बहुमूल्य खेळी केली. या विजयामुळे पाकिस्तानचा रन रेट देखील वाढला आहे.
205 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या सलामीच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजावर तुटून पडले. दोघांनीही बांगलादेशच्या गोलंदाजांचा यथोच्च समाचार घेतला. अब्दुल शफिक आणि फकर जमान यांनी पहिल्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी केली. त्यानंतर शफिक 69 चेंडू मध्ये 68 धावा काढून बाद झाला. शफिक बाद झाल्यावर मैदानात आलेल्या कर्णधार बाबर आजमने सर्वांची निराशा केली. तो अवघ्या नऊ धावांवर परतला.
बाबर आजम व अब्दुला शफिक बाद झाल्यावर सलामीचा फलंदाज फखर जमान याने स्फोटक फलंदाजी सुरूच ठेवली. त्याने 74 चेंडूत 81 धावांची स्फोटक खेळी केली. फखर बाद झाल्यानंतर मोहम्मद रिजवान आणि इफ्तिकार अहमद यांनी पाकिस्तानचा डाव सांभाळला आणि विजय मिळवून दिला. रिजवान 26 आणि इफ्तिखार 17 धावांवर नाबाद राहिले.
सामन्याच्या सुरुवातीला बांगलादेशच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र बांगलादेशच्या सलामीच्या फलंदाजांनी निराशा केली. अवघ्या नऊ धावांवर दोन फलंदाज माघारी परतले होते. पहिल्या षटकात तन्जीम हसन हा शून्य धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर शांतो हा चार धावा काढून आफ्रिदीचा दुसरा बळी ठरला.
अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीम याने या महत्वपूर्ण सामन्यात छाप टाकू शकला नाही. तो अवघ्या पाच धावांवर माघारी परतला. चौथ्या विकेटसाठी महमुदुल्ला
आणि लिटन दास यांनी 75 धावांची भागीदारी रचली लिटन 45 धावा काढल्यानंतर इफ्तेखार अहमद याच्या चेंडूवर बाद झाला. तुफान फार्मात असलेला महमूदुल्लाह हा आफ्रिदीच्या एका चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. कर्णधार शाकिब उल हसनने 43 धावांचे योगदान दिले. तो हॅरिस राऊफच्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर मोहम्मद वसीम याने रिवर्स स्विंगचा जलवा दाखवत चार धावा तीन गडी बाद केले आणि बांगलादेशचा संघ 204 धावांवर आटोपला. शाहीन शाह आफ्रिदी व मोहम्मद वसीम यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.