चोराच्या उलट्या बोंबा..! “भारतात आमच्या खेळाडूंच्या जीवाला धोका, वर्ल्डकप खेळण्यास पाकिस्तान संघ भारतात पाठवणार नाही”, पाकिस्तानी माजी बोर्ड अध्यक्षाचा खुलासा..
पाकिस्तान क्रिकेट संघ यावर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात सहभागी होण्यास नकार देऊ शकतो. वृत्तानुसार, सरकारने पाकिस्तान संघाला भारत दौऱ्याची परवानगी दिलेली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानला विश्वचषकासाठी भारतात जाण्याची परवानगी नाकारण्यात आल्याचे वृत्त आहे.
द न्यूजच्या वृत्ता नुसार, पाकिस्तानच्या फेडरल सरकारने सुरक्षेचे कारण सांगून पाकिस्तानी संघाला वर्ल्ड कपसाठी एनओसी देण्यास नकार दिला आहे. केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार पाकिस्तानी खेळाडूंच्या सुरक्षेबाबत चिंतित असून संघाला भारतात पाठवणे हा मोठा धोका असेल त्यांचे म्हणणे आहे.
पाकिस्तान सरकारने सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली: द न्यूजच्या वृत्तानुसार, एका सरकारी अधिकाऱ्याने पाकिस्तानच्या भारत भेटीबाबत सांगितले की, आम्हाला सुरक्षेची गंभीर चिंता आहे आणि त्यामुळेच आम्ही आमच्या क्रिकेटपटूंना भारतात जाऊ देऊ शकत नाही.

खरे तर भारताने आशिया चषकासाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता आणि तेव्हापासून पाकिस्तानने विश्वचषकासाठी भारतात जाऊ नये असे तिथून बोलले जात होते. पण बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे सांगितले होते. यानंतर पाकिस्तान बोर्डाचे माजी प्रमुख रमीझ राजा यांनी सांगितले होते की, जर भारताने पाकिस्तानचा दौरा केला नाही तर ते त्याच्या शिवाय आशिया कपचे आयोजन करतील.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये भारतात 13वा एकदिवसीय विश्वचषक आयोजित केला जाईल, ज्याचा अंतिम सामना 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. पाकिस्तानने विश्वचषकावर बहिष्कार घालण्याची धमकी दिली होती आणि आपला संघही भारत दौऱ्यावर जाणार नसल्याचे सांगितले होते.