नीट खेळता येत नाही, आणि दुसर्यावर राग काढताहेत’. दुसरी कसोटी तर हरलेच शिवाय सिरीजसुद्धा हातातून गेली म्हणून इंग्लंडच्या खेळाडूसोबत केले धक्कादायक वर्तन.. पहा व्हिडीओ.
इंग्लंडने दुसर्या मुल्तान कसोटी सामन्यात पाकिस्तानला 26 धावांनी पराभूत केले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. 355 धावांचे लक्ष असतांना पाकिस्तानने एक धाडसी लढाई केली पण 328 धावांवर सर्वबाद झाले.. आणि इंग्लंड संघाने या सिरीजमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली.
पहिल्या डावात इंग्लंडने 281 धावा केल्या तर त्याच्या प्रत्युतरात पाकिस्तानकडून पहिल्या डावात 202 धावा काढण्यात आल्या. यानंतर पुन्हा फलंदाजीस आलेल्या इंग्लंड संघाने जबरदस्त फलंदाजी करत 275 धावा कुटल्या. त्यामुळे पाकिस्तान संघासमोर कसोटी विजयासाठी 355 धावांचे लक्ष होते. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्यांना हे लक्ष पार करू दिले नाही.

पाकिस्तानचे अष्टपैलू खेळाडू शकील आणि इमाम उल हक या दोघांनी जबरदस्त फलंदाजी करत एकवेळेस संघाला विजयाच्या समीप आणले मात्र ते संघाला विजयी करण्यास अपयशी ठरले. दुसरीकडे दुसऱ्या डावात पुन्हा एकदा स्टार सलामीवर मोहम्मद रिजवान फक्त 30 धावा काढू शकला. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम या डावात केवळ एक धाव काढू शकल्याने तो सुद्धा चांगलाच ट्रोल होतोय.
दुसरीकडे इंग्लंडकडून गोलंदाज मार्क वूडने 4 गडी बाद करत पाकिस्तान संघाची कंबर मोडली. सामना संपल्यानंतर मात्र पाकिस्तानी खेळाडू मैदानावर धिंगाणा घालतांना दिसून आले. सामना संपल्यानंतर दोन्ही संघाकडून मैदानावर हस्तालोंदन केले जाते. हे करत असतांना पाकिस्तानी खेळाडूनी मुद्दाम मार्क वूड आणि वेन स्टोक्स यांच्याशी हात मिळवणी केली नाही.
— Guess Karo (@KuchNahiUkhada) December 12, 2022
सोशल मिडियावर याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.लोकांनी यावेळी पाकिस्तान संघालाही चांगलेच ट्रोल केल आहे.’ नीट खेळता येत नाही, आणि दुसर्यावर राग काढताहेत’ अश्या शब्दात लोकांना पाकिस्तान संघाला ट्रोल करायला सुरवात केली आहे.
पाहूया काही ट्वीट..
*Pakistan fans having some little hopes in their hearts*
Aleem Dar: #PAKvENG pic.twitter.com/JYdsEz6bBO— 𝓢𝓮𝓱𝓻𝓲𝓼𝓱 🇵🇰 (@itsmeSehrish) December 12, 2022
Ghante ka king 🤣🤣#BabarAzam #engvsPak
— Sanskari आत्मनिर्भर Launda 🇮🇳 (@verysanskari) December 12, 2022
हेही वाचा:
विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..