IPL 2024: एक घाव आनं शंभर तुकडे! प्रीती झिंटाच्या या खेळाडू एका शॉट मध्ये केले स्पायडर कॅम चे तुकडे. केले लाखो रुपयांचे नुकसान, व्हिडिओ वायरल.

0

 

22 मार्च पासून आपल्या देशात आयपीएल T20 च्या सतराव्या हंगामाला सुरुवात झाली. आपल्या देशात क्रिकेट चे महत्व हे आयपीएल T20 सामन्यांमुळे समजले. आयपीएल मुळे आपल्या देशातील अनेक नवीन तसेच युवा खेळाडूंना देशासाठी खेळण्याची संधी मिळाली त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पातळीवर मोठ्या प्रमाणात बदल सुद्धा घडून आले आहेत हे सर्व शक्य आयपीएल सामन्यांमुळे झाले आहे.

 

पंजाब किंग
पंजाब किंग

यंदा च्या सीजन मध्ये प्रीती झिंटा ची असलेली किंग पंजाब या संघाला आयपीएल मध्ये लागोपाठ 3 सामन्यात हार मिळाली आहे. किंग पंजाब चा तिसरा सामना हा LSG लखनऊ संघाबरोबर होता परंतु या सामन्यात सुद्धा संघाला पराभुताचा सामना करावा लागला आहे शिवाय या सामन्यात एका खेळाडूने प्रीती झिंटा चे लाखो रुपयांचे नुकसान सुद्धा केले आहे.

पंजाब किंग
पंजाब किंग

 

कसे झाले लाखो रुपयांचे नुकसान:-

काल झालेल्या सामन्यात प्रीती झिंटा चे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे परंतु नेमका काय प्रकार घडला होता? तर काल झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाचा आक्रमक फलंदाज लियाम लिव्हिंग्सन ने एक सरळ शॉट लावला तोच चेंडू स्पायडर कॅमेरा वर लागला आणि कॅमेरा फुटला. स्पायडर कॅमेरा ची किंमत ही लाखो रुपये असते त्यामुळे सामना हारून सुद्धा प्रीती झिंटा ला लाखो रुपयांचे नुकसान झाले.

 

 

प्रिती झिंटाच्या खेळाडूने केले लाखोंचे नुकसान:-

पंजाब किंग्जचा मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज लियाम लिव्हिंग्सन हा दुखापतग्रस्त असून सुद्धा मैदानात खेळण्यासाठी उतरला. मैदानात उतरल्यावर संघाला विजय मिळवून देण्यासाठी लियाम लिव्हिंग्सन ने एक जोरदार स्ट्रेट शॉट खेळाला तोच चेंडू जाऊन स्पायडर कॅमेरा वर लागला. तसेच कॅमेरा सुद्धा तुटला शिवाय त्यामधील असणारे सगळ्या मूव्हमेंट सुद्धा गायब झाल्या.

लिव्हिंगस्टनचा प्रयत्न फसला:-

लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जचा आक्रमक फलंदाज लियाम लिव्हिंग्स्टनच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर त्याने १७ चेंडूत २८ धावा केल्या. त्याचबरोबर या सामन्यात 2 चौकार आणि 2 षटकार सुद्धा झळकावले. तरी सुद्धा संघाला पराभुताचा सामना करावा लागला. 200 धावांचा पाठलाग करत पंजाब किंग्जला 20 षटकात केवळ 178 धावा करता आल्या शिवाय 5 फलंदाज बाद सुद्धा झाले. तरीसुद्धा संघाच्या हाती पराभूत आला.

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.