या16 वर्षीय तरुण गोलंदाजाने रणजी ट्रॉफीमध्ये घातला धुमाकूळ, एकट्यानेच विरोधी संघाच्या 9 खेळाडूंना पाठवले तंबूत, पदार्पणात 9 विकेट घेणारा ठरला सर्वांत लहान खेळाडू..!
या16 वर्षीय तरुण गोलंदाजाने रणजी ट्रॉफीमध्ये घातला धुमाकूळ, एकट्यानेच विरोधी संघाच्या 9 खेळाडूंना पाठवले तंबूत, पदार्पणात 9 विकेट घेणारा ठरला सर्वांत लहान खेळाडू..!
रणजी ट्रॉफी 2022-23 च्या मोसमात, जिथे अर्जुन तेंडुलकर त्याच्या दमदार शतकी खेळीमुळे चर्चेत आहे, त्याच दरम्यान, प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या आणखी एका युवा खेळाडूने आपल्या जबरदस्त कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे.त्याच्या पाहील्याच सामन्यातील कामगिरीने तो सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला आहे.
भारताच्या एका 16 वर्षीय खेळाडूने आपल्या प्रथम श्रेणी पदार्पणाच्या सामन्यात आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे, या युवा गोलंदाजाचे नाव आहे ‘फिरोइजाम जोतिन सिंग’ त्याने आदल्या दिवशी सिक्कीम विरुद्ध एकहाती सामना जिंकून दिला आहे . या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने मणिपूर संघासाठी 9 विकेट घेत एक विशेष कामगिरी आपल्या नावावर केली.
खरं तर, भारतीय देशांतर्गत क्रिकेट संघाची सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफी 2022-23 च्या नवीन हंगामात, अनेक युवा खेळाडू चमकदार कामगिरी करून प्रसिद्धी मिळवताना दिसत आहेत.
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आदल्या दिवशी धडाकेबाज शतक झळकावून सर्वांना प्रभावित केले असतानाच, मणिपूर आणि सिक्कीम यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात एका युवा गोलंदाजाने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच घातक कामगिरी करून दाखवली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मणिपूरने 186 धावा केल्या होत्या. त्यांचा डाव पहिल्याच दिवशी म्हणजे १३ डिसेंबरला खिळखिळा झाला.

सिक्कीमने पहिला दिवस बिनबाद 58 धावांनी संपवला. पण दुसऱ्या दिवशी फिरोजम जोतीन सिंगने कहर केला आणि सिक्कीमच्या 9 फलंदाजांना एकहाती आपल्या जाळ्यात अडकवून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याच्याशिवाय रेक्स राजकुमारने एक विकेट घेतली.
जोतीनने आधी अरुण छेत्रीला बाद केले आणि नंतर इथून पुढे ठरविक वेळेने विकेट्स घेणे सुरूच ठेवले. रेक्सने 39 धावा करणाऱ्या अन्वेस शर्माची विकेट घेतली. अशा स्थितीत आपल्या पदार्पणाच्या सामन्यात फिरोज खानने 9 विकेट घेत सर्वांना प्रभावित केले.
एवढेच नाही तर 9 विकेट घेतल्यानंतर जोतीन सिंगला त्याच्या 10व्या विकेटची अपेक्षा होती. पण खुद्द फैरोझमने त्याचा सहकारी गोलंदाज रेक्स राजकुमारच्या गोलंदाजीवर अन्वेश शर्माचा झेल घेत ही आशा तोडली. तथापि, जर फैरोझमने 10वी विकेट घेतली असती तर पदार्पणाच्या डावात 10 बळी घेणारा तो जगातील फक्त तिसरा गोलंदाज ठरला असता.
फैरोझम हा विक्रम करणारा जगातील सर्वात तरुण गोलंदाज आहे.
Jotin Pheiroijam 9 WICKETS! (18.4-4-52-9), Sikkim 189/9 #SIKvMAN #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 14, 2022
16 वर्षीय फिरोजम जोतीन सिंगने पदार्पणाच्या सामन्यात 9 विकेट घेत एक विशेष कामगिरी केली आणि पदार्पणातच ही कामगिरी करणारा तो जगातील सर्वात तरुण गोलंदाज ठरला. त्याच्या आधी हा विक्रम भारताच्या वसंत रांजणेच्या नावावर होता, ज्यांनी वयाच्या 19 व्या वर्षी (7066 दिवस) हा विक्रम केला होता.
त्याच वेळी, इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठाच्या जेएच किरवान यांनीही वयाच्या 19 व्या वर्षी हा विक्रम केला होता, परंतु त्यावेळी त्यांचे वय 7091 दिवस होते. फैरोजम हा अष्टपैलू खेळाडू असून तो बॅटने लांब षटकारही मारू शकतो. त्याने चांगली कामगिरी करत राहिल्यास भविष्यात भारताला नवा हार्दिक पांड्या मिळू शकतो.
हेही वाचा:
क्रिकेट मैदानावर सर्वांत जास्त स्पीडने गोलंदाजी करण्याचा विक्रम या 5 गोलंदाजांच्या नावावर राहिलाय..
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..