IPL 2024: यंदाच्या आयपीएलसाठी सर्वच संघाला मिळणार एवढे खेळाडू बदलण्याची संधी, या दिवशी होणार मिनी लिलाव..

0

PL 2024: IPL 2024 सुरू व्हायला अजून बराच वेळ बाकी आहे पण IPL च्या पुढच्या सिझनची तयारी आधीच सुरू झाली आहे. बीसीसीआयने 15 नोव्हेंबरपर्यंत आयपीएल संघांच्या कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, अशीही बातमी येत आहे की, लिलावापूर्वी गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आपापल्या खेळाडूंचा व्यापार करण्यासाठी चर्चा करत आहेत.

IPL 2024: यंदाच्या आयपीएलसाठी सर्वच संघाला मिळणार एवढे खेळाडू बदलण्याची संधी, या दिवशी होणार मिनी लिलाव..

आयपीएल संघ या खेळाडूंचा करू शकतात ट्रेड..

IPL 2024 च्या संदर्भात, IPL फ्रँचायझी गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स त्यांच्या खेळाडूंचा व्यापार करण्यासाठी चर्चा करत आहेत असे सूत्रांच्या हवाल्याने वृत्त आहे. बातम्यांनुसार, गुजरात टायटन्स फ्रँचायझी शिवम मावी आणि राहुल तेवतियाला लखनऊमध्ये देऊ इच्छिते आणि कृणाल पंड्याला त्यांच्या संघात सामील करून घेते. तथापि, दोन्ही फ्रँचायझींकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. असे झाले तर कृणाल पंड्या आणि हार्दिक पांड्या या भाऊंची जोडी आयपीएल 2024 मध्ये पुन्हा एकदा एकत्र खेळताना दिसणार आहे.

या दिवशी होणार  IPL 2024 चा लिलाव (ipl 2024 auction)

IPL 2024: यंदाच्या आयपीएलसाठी सर्वच संघाला मिळणार एवढे खेळाडू बदलण्याची संधी, या दिवशी होणार मिनी लिलाव..

आयपीएल फ्रँचायझींनी आयपीएल 2024 मध्ये कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी 15 नोव्हेंबरपर्यंत आयपीएल समितीला सादर करायची आहे. तर IPL 2024 चा मिनी लिलाव 19 डिसेंबर 2023 रोजी दुबईत होणार आहे. यावेळी आयपीएल लिलावात मोठे परदेशी खेळाडू सहभागी होऊ शकतात. ज्यांच्यावर प्रत्येक फ्रेंचायझीची नजर असेल.

मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, अॅलेक्स हेल्स, सॅम बिलिंग्ज, जेराल्ड कोएत्झी, ट्रॅव्हिस हेड आणि ख्रिस वोक्स असे अनेक मोठे परदेशी खेळाडू आहेत. यापैकी मिचेल स्टार्क 8 वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणार आहे. यापूर्वी तो २०१५ च्या आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळला होता. प्रत्येक संघाला त्यांच्या संघात त्याचा समावेश करण्यासाठी लिलावात जुगार खेळायला आवडेल.


हेही वाचा:

विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.

अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave A Reply

Your email address will not be published.