- Advertisement -

या 3 खेळाडूंसाठी भारतीय संघाचे दरवाजे झालेत कायमचे बंद, तरीही अजून जाहीर केली नाही निवृत्ती,एकजण तर आहे सर्वांत जुना खेळाडू..

0 6

या 3 खेळाडूंसाठी भारतीय संघाचे दरवाजे झालेत कायमचे बंद, तरीही अजून जाहीर केली नाही निवृत्ती..


टीम इंडियात खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. काहींनी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून भारतीय संघात आपले स्थान पक्के केले, तर काहींनी देशांतर्गत क्रिकेटच्या जोरावर टीम इंडियाचे तिकीट मिळवले, मात्र खराब कामगिरी करताच त्यांना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जातो.

एकदा संघातून बाहेर पडल्यानंतर या खेळाडूंचे पुनरागमन जवळपास अशक्य होते. काही काळापूर्वी खराब कामगिरीमुळे अनेक भारतीय खेळाडूंना टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. अशा स्थितीत त्यांचे पुनरागमन आता अशक्य असल्याची अटकळ बांधली जात आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच तीन खेळाडूंबद्दल सांगणार आहोत. ज्यांचे टीम इंडियात पुनरागमन करण्याचे स्वप्न जवळपास अशक्य असल्याचे बोलले जातंय. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते खेळाडू.

केदार जाधव : या यादीत पहिले नाव आहे टीम इंडियाचा खेळाडू केदार जाधवचे, जो आता संघाबाहेर आहे. संघात त्याला कितीही संधी मिळाल्या, त्याचा फायदा त्याला घेता आला नाही. आता अशा परिस्थितीत त्याला आता भारतीय संघातकधीही पुनरागमन करण्याची संधी मिळू शकत नाही. एकतर त्याची कामगिरी चांगली नाहीये शिवाय वाढलेलं वय आणि फिटनेस या सर्व गोष्टीमुळे सुद्धा संघातील स्पर्धा पाहता केदारला संधी मिळणे अशक्य आहे.

खेळाडू
खेळाडू

त्यामागचे कारण म्हणजे यावेळी संघात अनेक युवा खेळाडू आले आहेत.केदार जाधवने भारतासाठी 73 एकदिवसीय आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत आणि या दरम्यान त्यांनी अनुक्रमे 1389 धावा आणि 122 धावा केल्या आहेत तर गोलंदाजीत त्यांनी वनडेमध्ये 27 विकेट घेतल्या आहेत.

विजय शंकर : या यादीत दुसरे नाव आहे टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरचे, जो आता संघाबाहेर आहे. 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत त्याचा 3D खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता पण तो तेथे कोणतेही आश्चर्य दाखवू शकला नाही. तेव्हापासून तो भारतीय संघातून बाहेर आहे.

अशा स्थितीत तो कधी भारतीय संघात पुनरागमन करेल याची अजिबात आशा नाही. या खेळाडूने भारतासाठी 12 वनडे आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना अनुक्रमे 223 आणि 101 धावा केल्या आहेत आणि टी-20मध्ये गोलंदाजी करताना 5 विकेट्स घेतल्या आहेत.

इशांत शर्मा : या यादीत तिसरे नाव आहे ते टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माचे, जो आता संघाबाहेर आहे. इशांत फक्त कसोटी क्रिकेट खेळतो पण आता त्याला कसोटी संघातही स्थान मिळत नाही आणि युवा खेळाडूंच्या आगमनाने त्याचे पुनरागमन अवघड झाले आहे.

खेळाडू

 

या खेळाडूने भारतासाठी 105 कसोटी, 80 एकदिवसीय आणि 14 टी-20 सामने खेळले आहेत आणि यादरम्यान त्याने अनुक्रमे 311, 115 आणि 8 विकेट घेतल्या आहेत.

यामुळेच भारतीय संघातील वावाढती स्पर्धा आणि युवा खेळाडूची कामगिरी पाहता या 3 खेळाडूंना पुन्हा संघात जागा मिळण्याची शक्यता जवळपास संपली आहे. म्हणूनच येत्या काही दिवसात हे खेळाडू आपली कारकीर्द संपवून निवृत्ती जाहीर करू शकतात.


हेही वाचा:

आमीर खानच्या लेकीच्या साखरपुड्यात तिच्याच रेड ड्रेसची चर्चा, दिसत होती एकदम सुंदर तर ड्रेसची किंमत वाचून बसेल धक्का..

न्युझीलंडविरुद्ध एकाच सामन्यात विजय मिळवताच हार्दिक पंड्यामध्ये आला अहंकार, “म्हणाला आता मी गोलंदाजी करणार नाही”

पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…

 

Leave A Reply

Your email address will not be published.