आयपीएल 2023 मध्ये खेळू न शकलेले हे 8 स्टार खेळाडू यंदाच्या लीग मध्ये करताहेत पुनरागमन, यादीमध्ये भारताचे युवा खेळाडूही सामील..

0

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

आयपीएल 2023 : ‘यॉर्कर स्पेशालिस्ट’ भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा आयपीएल 2023 मध्ये दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. यंदाच्या लीगसाठी तो पूर्णपणे फिट झाला असून मुंबई इंडियन्स साठी दमदार कामगिरी करण्यास तो सज्ज झाला आहे. मागील वर्षी त्याच्या गैरहजरीमध्ये मुंबई इंडियन्सला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याची उणीव मुंबई इंडियन्सच्या संघाला चांगली जाणून आली.

1.ऋषभ पंत

आयपीएल 2023 मध्ये खेळू न शकलेले हे 8 स्टार खेळाडू यंदाच्या लीग मध्ये करताहेत पुनरागमन, यादीमध्ये भारताचे युवा खेळाडूही सामील..

2022 मध्ये भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचा अपघात झाला होता. त्यामुळे तो बऱ्याच दिवस क्रिकेटपासून दूर होता. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याचा दीड वर्षाहून अधिक काळ गेला. यामुळे तो आयपीएल 2023 च्या सामन्यांना मुकला. यंदा तो परिपूर्णरित्या फिट असून 2024 च्या लीग मध्ये तो दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे.

2.श्रेयश अय्यर

‘स्टायलिश’ फलंदाज श्रेयश अय्यर हा देखील दुखापतीमुळे आयपीएल 2023 मध्ये खेळू शकला नाही त्याच्या अनुपस्थितीमध्ये संघाच्या नेतृत्वाची धुरा हा नितेश राणा सांभाळत होता. यंदा श्रेयश अय्यर फिट असून तो नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. रणजी क्रिकेटमधील अंतिम सामन्यांमध्ये त्याने विदर्भ विरुद्ध 95 धावांची धडाकेबाज खेळी करत दमदार पुनरागमन केले होते.

3.रजत पाटीदार

रजत पटीदार स्नायू दुखावल्यामुळे आयपीएल 2023 मध्ये खेळू शकला नाही. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेमध्ये रजत पाटीदार ने कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण केले होते. मात्र तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावाला लौकिक असा साजेशी खेळ करू शकला नाही. सध्या तो पूर्णपणे फिट असून आयपीएल 24 मधील सर्व सामने खेळण्यासाठी तो तयार आहे.

4. प्रसिद्ध कृष्णा

आयपीएल 2023 मध्ये खेळू न शकलेले हे 8 स्टार खेळाडू यंदाच्या लीग मध्ये करताहेत पुनरागमन, यादीमध्ये भारताचे युवा खेळाडूही सामील..

राजस्थान रॉयल्स संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हा कमरेच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 मध्ये खेळू शकला नाही. या दुखापतीतून तो आता सावरला असून येणाऱ्या आयपीएल मध्ये तो दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. रणजी क्रिकेट खेळताना त्यालाही दुखापत झाली होती. मागील वर्षी देखील तो दुखापतीमुळे आयपीएलला मुकला होता. त्याची बेस प्राईस ही एक कोटी रुपयाची होती. राजस्थान रॉयल्सच्या संघाने त्याला दहा कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. आयपीएलच्या आतापर्यंत खेळलेल्या 51 सामन्यात त्याने 49 गडी बाद करण्यात त्याला यश मिळाले.

5.मुकेश चौधरी

चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा मुकेश चौधरीने 2022 आयपीएल 2022 मध्ये आपल्या धारदार गोलंदाजीने सर्वच फलंदाजाचे धाबे दणाणून सोडले होते. मात्र मागील वर्षी तो आयपीएलमध्ये अनफिट होता. त्यामुळे तो खेळू शकला नाही. यंदा तो पूर्णपणे तयारीनुसार मैदानात उतरला आहे.

6.केन विलियम्सन

न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विलियम्सन हा आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध खेळताना पहिल्याच सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला होता. यंदा तो फिट असून त्याच्या संघासाठी धावा करण्यासाठी सज्ज झाला आहे.

भारतीय संघातून हकालपट्टी झाल्यानंतर श्रेयस अय्यरने घेतला मोठा निर्णय ,आता या संघाकडून क्रिकेट खेळणार श्रेयस अय्यर..!

7.मिचेल स्टार्क

आयपीएल 2024 मधला सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्क हा यंदा केकेआर च्या संघाकडून खेळणार आहे. केकेआर ने त्याला 24.75 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. 2022 नंतर तो पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळतोय.

8.पॅट कमिन्स

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील व्यस्त वेळापत्रकामुळे आयपीएल 2023मध्ये त्याने खेळण्यास नकार दिला होता. यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये तो सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करणार आहे. हैदराबादने त्याला 20.50 कोटी रुपये देऊन आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave A Reply

Your email address will not be published.