हे आहेत सलग तीन सामन्यात शून्यावर बाद होणारे 5 दिग्गज फलंदाज, वाचा ‘डक’ ची हॅट्रिक कोणी कोणी साधलीय..

हे आहेत सलग तीन सामन्यात शून्यावर बाद होणारे 5 दिग्गज फलंदाज, वाचा 'डक' ची हॅट्रिक कोणी कोणी साधलीय..

शून्यावर बाद होणारे 5 दिग्गज फलंदाज : जागतिक क्रिकेटने आजपर्यंत अनेक नामवंत खेळाडू दिले आहेत. टी 20 क्रिकेटच्या उदयामुळे तर रोज एकतरी नवा स्टार खेळाडू उदयास येतोय. टी 20 क्रिकेटमुळे आता शतक देखील नियमितपणे पाहायला मिळते. एखाद्या खेळाडूने शतक जरी ठोकले तर ,त्याची चर्चा वर्षानुवर्ष चालते. तसेच एखादा फलंदाज शून्यावर जर बाद झाला गोलंदाजांना विलक्षण आनंद होतो. तर फलंदाजास मात्र हे क्षण आयुष्यभर हृदयावर काटे टोचल्यासारखे आहे.

आज आपण या लेखांमध्ये अशा एका नकोशा विक्रमाची माहिती पाहणार आहोत जो की कोणत्याही फलंदाजाला आपल्या नावावर व्हावे असे वाटत नाही. आज आपण वनडे क्रिकेटमध्ये सलग तीन सामन्यात शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजाविषयी माहिती घेणार आहोत. सलग तीन सामन्यात शून्यावर बाद होणारे हे पाच जागतिक दर्जाचे फलंदाज आहेत. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते फलंदाज..

 

सलग 3 सामन्यात शून्यावर बाद होणारे फलंदाज!

1. सचिन तेंडुलकर

भारताचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आपल्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये विक्रमांचे विक्रम रचले आहेत. त्यांचे काही विक्रम मोडीत काढले गेलेत तर काही विक्रम आजही अबाधित आहेत. ते मोडणे जवळपास अशक्यच आहे. असे असताना देखील त्याच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत प्रत्येक गोलंदाजाची हजेरी घेणाऱ्या तेंडुलकरला देखील वाईट दिवस पहावे लागले. 1994 साली सलग 3 सामन्यात तो शून्यावर बाद झाला आहे. शून्यावर बाद होण्याची हॅट्रिक साधणारा तो पहिला फलंदाज आहे.

Sachin Tendulkar Records विश्वचषक स्पर्धेत एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये सचिन तेंडूलकरचाच बोलबाला,पहा यादी.

2.रिकी पॉंटिंग

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याने आपल्या संघाला दोनदा वनडे चॅम्पियन बनवले आहे. 2003 आणि 2007 मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने विश्वचषक उंचावला होता. एक चतूर कर्णधार, आक्रमक फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याने ख्याती मिळवली होती. जागतिक दर्जाच्या या फलंदाजाच्या नावावर देखील एका नकोशा विक्रमाची नोंद झाली होती. सलग तीन सामन्यात शून्यावर बाद होण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज आहे. 2000 साली सलग तीन सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता.

हे आहेत सलग तीन सामन्यात शून्यावर बाद होणारे 5 दिग्गज फलंदाज, वाचा 'डक' ची हॅट्रिक कोणी कोणी साधलीय..

3. शोएब मलिक

मधल्या फळीत खेळणारा पाकिस्तानचा माजी स्टायलिश अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक हा देखील 23 साली न्यूझीलंड विरुद्ध खेळताना सलग तीन सामन्यात शून्यावर बाद झाला होता. सलग तीन सामन्यात शून्यावर बाद होण्याचा पराक्रम करणारा तो तिसरा खेळाडू ठरला तर पाकिस्तानचा पहिलाच फलंदाज ठरला.

4.अँड्रू सायमन्ड

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी अष्टपैलू खेळाडू अँड्रू सायमन्ड याने देखील आपल्या कारकिर्दीमध्ये भरीव असे योगदान दिले आहे. 2003 मध्ये विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध खेळताना त्याने अविश्वसनीय शतकी खेळी केली होती. एक जागतिक दर्जाचा उत्तम अष्टपैलू खेळाडू असून देखील त्याला त्याच्या गैर वर्तणुकीवर लगाम ठेवता आला नाही. प्रचंड व्यसनाच्या आहारी गेल्याने त्याला सांगा बाहेर राहावे लागले. 2004 मध्ये तो सलग तीन सामन्यात शून्यावर बाद झाला होता. दोन वर्षांपूर्वी त्याचे एका कार अपघातात निधन झाले आहे.

हे आहेत सलग तीन सामन्यात शून्यावर बाद होणारे 5 दिग्गज फलंदाज, वाचा 'डक' ची हॅट्रिक कोणी कोणी साधलीय..

5. महेला जयवर्धने

आपली विकेट घेण्यासाठी गोलंदाजांना प्रचंड घाम गाळायला लावणारा श्रीलंकेचा माजी चिवट फलंदाज महेला जयवर्धने हा देखील सलग तीन सामन्यात शून्यावर बाद झाला आहे. 2008 मध्ये झिंबाब्वे विरुद्ध खेळताना हा नकोसा विक्रम त्याच्या नावावर झाला. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला होता.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *