आश्चर्यम! विश्वचषक स्पर्धेत एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एकही नाही भारतीय खेळाडू,पहा यादी.

विश्वचषक सारख्या मोठ्या इव्हेंटमध्ये फलंदाज क्रिकेटच्या मैदानावर चौकार षटकारांची आतिषबाजी करून आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करत असतात.

काही खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेतील एका सामन्यात इतके षटकार ठोकलेत की ,त्यांचा विक्रम मोडणे तर सोडा  साधा मोडण्याचा विचार करणे देखील अशक्य आहे. विशेष म्हणजे या खेळाडूंच्या यादीत एकही भारतीय खेळाडू नाही

. आज या लेखामध्ये आपण विश्वचषक स्पर्धेमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर सुरवात करूया आजच्या या लेखाला.

IND vs BAN: “बांग्लादेशने भारतला हरवल्यास मी चक्क…” पाकिस्तानी अभिनेत्रीची बांगलादेशी खेळाडूंना मोठी ऑफर, भारताला हरवा आणि माझ्यासोबत..

या खेळाडूंनी विश्वचषकाच्या एका सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकलेत.

 

 इयान मॉर्गन: इंग्लंडचा माजी कर्णधार इयान मॉर्गन याने 2019 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्ध खेळताना तब्बल 17 षटकार ठोकले होते. त्याची ही विस्फोटक खेळी आज ही क्रिकेट प्रेमींच्या मनात लक्षात आहे.

ख्रिस गेल: वेस्टइंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याने 2015 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत झिंबाब्वे विरुद्ध खेळताना चौकार-षटकारांचा पाऊस पडला होता. त्याने या सामन्यात एक दोन नव्हे तर तब्बल 16 षटकार ठोकले होते.

 

 मार्टिन गप्टिल: 2015 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत न्युझीलँड चा धडाकेबाज फलंदाज मार्टिन गप्टिल याने वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना एकाच सामन्यात 11 षटकारांची बरसात केली होती.

आश्चर्यम! विश्वचषक स्पर्धेत एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एकही नाही भारतीय खेळाडू,पहा यादी.

डेव्हिड मिलर: दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोत्तम फिनिश्वर पैकी एक असलेला डेव्हिड मिलर याने 2015 मध्ये झिंबाब्वे विरुद्ध खेळताना नऊ षटकार ठोकले होते.

 

रिकी पॉंटिंग: रिकी पॉंटिंग याने 2003 मध्ये भारताविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात 140 धावांची ऐतिहासिक शतकी खेळी केली होती. त्याच्या या शतकी खेळामुळे भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. भारतीय क्रिकेट प्रेमी त्याची ही शतकी खेळी कधीच विसरू शकणार नाही. या शतकी खेळीत त्याने तब्बल आठ षटकार ठोकले होते.

Riki Ponting Yuvakatta

इमरान नजीर: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला फॉलो करणारा पाकिस्तानचा इमरान नजीर याने 2007 मध्ये झिंबाब्वे विरुद्ध खेळताना एकाच सामन्यात आठ षटकार ठोकले आहेत.

 

ॲडम गिलकिस्ट : 2007 मध्ये वेस्टइंडीज मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्रीलंके विरुद्ध खेळताना ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ॲडम गिलकिस्ट याने 149 धावांची ऐतिहासिक खेळी केली. श्रीलंकेच्या प्रत्येक गोलंदाजाचा त्याने खरपूस समाचार घेतला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by AB de Villiers (@abdevilliers17)

एबी डिव्हिलियर्स : क्रिकेटच्या मैदानावर चौकार षटकारांची आतिषबाजी करून क्रिकेट प्रेमींचे मनोरंजन करणारा दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने 2015 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना 162 धावांची नावात केली होती. या खेळीत त्याने तब्बल आठ षटकार ठोकले होते.

कुशल मेंडिस: ज्याच्या नावातच कुशल आहे असा श्रीलंकेचा फलंदाज कुशल मेंडिस याने नुकत्याच झालेल्या साऊथ आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात 76 धावांची खेळी केली होती. यात एक दोन नव्हे तर तब्बल आठ षटकार ठोकले होते.


हेही वाचा:

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *