IPL RECORDS: हे आहेत आयपीएल मध्ये 20 व्या षटकात सर्वाधिक वेळा बाद होणारे खेळाडू; धोनीच्या नावावर असाही एक विक्रम!

IPL RECORDS: हे आहेत आयपीएल मध्ये 20 व्या षटकात सर्वाधिक वेळा बाद होणारे खेळाडू; धोनीच्या नावावर असाही एक विक्रम!

IPL RECORDS: आयपीएल मध्ये पंधरा ते विसाव्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. काही फलंदाज शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी करण्यावर भर देतात. काही खेळाडूंच्या नावावर शेवटच्या षटकात बाद होण्याचा विक्रम झाला आहे. यामध्ये भारतीय खेळाडू सर्वाधिक आहेत. या खेळाडूंची माहिती पुढील प्रमाणे.

हे आहेत आयपीएल मध्ये 20 व्या षटकात सर्वाधिक वेळा बाद होणारे खेळाडू!

1.महेंद्रसिंग धोनी

सीएसके संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आयपीएल मध्ये विसाव्या षटकात 32 वेळा बाद झाला आहे. सी एस के च्या संघात दोन्ही पाचव्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस येतो. तो शेवटपर्यंत आपली विकेट टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो. महेंद्रसिंग धोनीचे हे शेवटचे आयपीएल वर्ष असल्याचे बोलले जात आहे.

एम एस धोनीच्या निवृत्तीनंतर रोहित बनणार सीएसकेचा नवा सेनापती? माजी खेळाडूंनी दिले मोठे संकेत.

2.कायरन पोलार्ड

वेस्टइंडीज चा धडाकेबाज फलंदाज ‘कायरन पोलार्ड ‘ हा 24 वेळा विसाव्या षटकात आपली विकेट गमावली आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्याने मुंबई इंडियन्सला अनेक सामने जिंकून दिले आहेत. पोलार्ड सध्या मुंबई इंडियन संघाच्या सपोर्ट स्टाफ मध्ये काम करतोय.

3.रवींद्र जडेजा

सीएसके चा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांनी 22 वेळा विसाव्या षटकात आपली विकेट गमावली. एक उत्तम फिशर म्हणून जडेजाकडे आजही पाहिले जाते. या धडाकेबाज फलंदाजाने अनेक सामने एक हाती सामने जिंकून दिले आहेत.

4. हरभजन सिंग

फिरकीपट्टू हरभजन सिंग हा आयपीएल मध्ये विसाव्या षटकात 18 वेळा बाद झाला आहे. आठव्या-नवव्या क्रमांकावरच्या या फलंदाजाला पिच हिटर म्हणून अनेकदा खेळताना पाहिले आहे. गोलंदाजी सोबत आक्रमक फटकेबाजी देखील तो करत असायचा. हरभजन ने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. ते सध्या आम आदमी पार्टी या पक्षाचे लोकसभेचे खासदार आहेत..

IPL RECORDS: हे आहेत आयपीएल मध्ये 20 व्या षटकात सर्वाधिक वेळा बाद होणारे खेळाडू; धोनीच्या नावावर असाही एक विक्रम!

5.हरभजन सिंग

भुवनेश्वर कुमार हा देखील हरभजन सिंग प्रमाणे विसाव्या षटकात 18 वेळा बाद झाला आहे. आयपीएल मध्ये प्रभावशाली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कामगिरीत सातत्य राखता न आल्यामुळे संघात स्थान टिकवता आले नाही. यंदाच्या आयपीएल मध्ये दमदार कामगिरी करून त्याला पुन्हा एकदा राष्ट्रीय संघात स्थान पक्के करण्याची चांगली संधी आहे.

6.दिनेश कार्तिक

यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक हा देखील आयपीएल मध्ये विसाव्या षटकात पंधरा वेळा बाद झाला आहे. आयपीएलमध्ये प्रभावशाली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कामगिरीत सातत्य राखता न आल्यामुळे संघात स्थान टिकवता आले नाही. दिनेश काार्तिकचे हे शेवटचे आयपीएल वर्ष आहे.

7.प्रवीण कुमार

वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार हा देखील विसाव्या षटकात 15 वेळा बाद झाला आहे. स्विंग मध्ये माहीर असलेले या गोलंदाजाने आयपीएल मधून निवृत्ती घेतले आहे. त्याने आयपीएल मध्ये पंजाब आणि बंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

8.हार्दिक पांड्या

मुंबई इंडियन संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या याने देखील विसाव्या षटकात 14 वेळा आपली विकेट गमावली आहे. हार्दिक पांड्या आयपीएल मध्ये पाचव्या व सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत असतो. यंदा तो कर्णधार असल्यामुळे कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार हे अद्याप निश्चित झाले नाही.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *