Most Duck in IPL: आयपीएल मध्ये सर्वाधिक वेळा गोल्डन डक झालेले हे आहेत फलंदाज; चार पैकी तीन आहेत भारतीय खेळाडू

0
4
Most Duck in IPL: आयपीएल मध्ये सर्वाधिक वेळा गोल्डन डक झालेले हे आहेत फलंदाज; चार पैकी तीन आहेत भारतीय खेळाडू

 Most Duck in IPL: इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्ये (IPL) जगभरातील खेळाडूंनी अविश्वसनीय विक्रम केले आहेत. फलंदाज आणि गोलंदाजांनी वेगवेगळे विक्रम केलेले पाहायला मिळतात. आज आम्ही या लेखांमध्ये आपणाला आयपीएल मध्ये सर्वाधिक वेळा शून्य धावसंख्येवर बाद झालेल्या खेळाडूंची माहिती देणार आहोत.

IPL RECORDS: आयपीएलच्या इतिहासात हे खेळाडू झालेत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद..

IPL 2024 Schedule: अखेर आयपीएल 2024 चे वेळापत्रक समोर, आयपीएल दरम्यान होणार लोकसभेच्या निवडणुका? संभ्रम कायम..

1. दिनेश कार्तिक

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्य धावसंख्येवर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर दिनेश कार्तिकचे नाव येते. तो एक-दोन वेळा नव्हे तर 17 वेळा शून्यावर बाद झाला आहे. यष्टीरक्षक फलंदाज कार्तिक जगातला सर्वोत्तम फिनिशर मानला जातो. यंदाच्या वर्षात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचे प्रतिनिधित्व करतोय. हे त्याचे कदाचित शेवटचे आयपीएलचे वर्ष असू शकते.

 

2.रोहित शर्मा

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे देखील नाव आहे. हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. सर्वाधिक वेळा गोल्डन डक झालेल्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा दिनेश कार्तिक नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. रोहित तब्बल 16 वेळा शून्य धावसंख्येवर बाद झाला आहे. हा नकोसा वाटणारा विक्रम स्वतःच्या नावावर करणाऱ्या रोहित शर्मा ने मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले आहे. यंदाच्या वर्षात तो केवळ खेळाडू म्हणून संघात असणार आहे. संघाच्या नेतृत्वाचे धुरा हार्दिक पांड्या कडे सोपवण्यात आली आहे.

रोहीत शर्मा आयपीएल

३. सुनील नरेन 

वेस्टइंडीजचा मिस्टरी फिरकीपटू सुनील नरेन हा आयपीएलमध्ये 15 वेळा गोल्डन डक झाला आहे. आयपीएल मध्ये केकेआर संघाचे तो प्रतिनिधित्व करतोय. वेस्टइंडीज संघाकडून खेळताना तो आठव्या अथवा नवव्या स्थानावर फलंदाजीला येत होता. मात्र केकेआरच्या संघाकडून खेळताना तो अनेकदा सलामीला खेळताना पाहायला मिळाला.

४. मंदिप सिंग

 Most Duck in IPL: आयपीएल मध्ये सर्वाधिक वेळा गोल्डन डक झालेले हे आहेत फलंदाज; चार पैकी तीन आहेत भारतीय खेळाडू

केकेआर संघाचा सदस्य मंदिप सिंग हा देखील या यादीत चौथ्या स्थानावर आहे. इंडियन प्रीमियर लीग मध्ये तो तब्बल 15 वेळा भोपळाही न फोडता शून्य धावसंख्येवर बाद झाला. आयपीएलमध्ये सुरुवातीच्या काळात तो किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करत होता. आयपीएल गाजवणाऱ्या या खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी संधी मिळाली नाही.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 IPL 2024 : जाणून घ्या या IPL सिझन मध्ये कोणत्या संघात आहेत सर्वात धोकादायक आणि वेगवान गोलंदाज, वाचा सविस्तर

सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत या नवीन खेळाडूचा समावेश, रोहित शर्मा आणि विराट कोहली नंतर येतो त्याचा नंबर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here