Nervous 90: भारताने रविवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या चार गडे राखून पराभव केला. भारताच्या या विजयात विराट कोहलीचे सर्वात मोठे योगदान होते. प्रत्येक सामन्यात एक मैलाचा दगड पार करणारा विराट सातव्यांदा नर्वस 90 (Nervous 90) चा शिकार झाला. वनडे क्रिकेटमध्ये नर्वस 90 होणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये विराट कोहली आता नवव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने 286 सामन्यात 7 वेळा 90 ते 99 च्या दरम्यान बाद झाला आहे.
सर्वांत जास्त वेळा नर्वस 90 (Nervous 90) चा शिकार झालेत हे खेळाडू.
सचिन तेंडुलकर: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 463 वनडे सामन्यात 18 वेळा शिकार झाला आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये सर्वाधिक वेळा नर्वस 90चा शिकार झाला आहे. अठरा वेळा नर्वस-90 झालेल्या सचिनने आणखीन थोडा संयम दाखवला असतात तर वनडे क्रिकेटमधील त्याची शतकांची आकडेवारी ही खूपच पुढे गेली असती.

ग्रँट फ्लावर: झिम्बाब्वेचा मधल्या फळीतील माजी फलंदाज ग्रँट फ्लावर हा देखील 9 वेळा नर्वस 90चा बळी ठरला आहे. आपल्या कारकिर्दीत अत्यंत तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळखला जाणारा फ्लावर याने एक दिवसीय क्रिकेटमध्ये 221 सामने खेळला आहे. आपल्या कारकिर्दीमध्ये गोलंदाजाच्या नाकावर टिचून तो फलंदाजी करायला उभारायचा. गोलंदाजाला आपली विकेट सहजासहजी देत नसे. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर पाकिस्तानचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.
नाथन एस्टल: न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज नाथन एस्टल याने त्याच्या कारकीर्दीमध्ये नऊ वेळा नर्वस 90चा शिकार झाला आहे. एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ख्याती होती. 221 वनडे सामन्यात त्याने न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व केले होते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक ठोकले होते.
अरविंद डिसलव्वा : श्रीलंकेचा मधल्या फळीत खेळणारा माजी फलंदाज अरविंद डिसलव्वा याने 308 सामन्यात तब्बल नऊ वेळा नर्वस 90 चा शिकार झाला आहे. लंकेला1996 चा विश्वचषक जिंकून देण्यासाठी संघात मोलाचे योगदान दिले होते.
केन विलियम्सन : 2023च्या विश्वचषक स्पर्धेत दुखापतीमुळे बाहेर बसलेला न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने आठ वेळा 90 ते 99 धावांच्या मध्ये बाद झाला आहे. 162 वनडे सामन्यात न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू जागतिक क्रिकेटमधला सर्वोत्तम फलंदाज मानला जातो.
जॅक कॅलिस: दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस यांनी 328 सामन्यात आठ वेळा नर्वस 90 झाला आहे. एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची जगभरात ख्याती होती. सध्या तो आयपीएलमध्ये केकेआर संघाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे.
शिखर धवन : भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवन याने 167 सामन्यात सात वेळा तर मोहम्मद अझरुद्दीन याने 334 सामन्यात सात वेळा नर्वस 90 झाले आहेत. वरील यादीतील खेळाडूंमध्ये केवळ केन विल्यम्सन, विराट कोहली आणि शिखर धवन हेच सध्या ऍक्टिव्ह खेळाडू आहेत इतर सर्व खेळाडू हे निवृत्त झाले आहेत.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.
- अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी