आयपीएल मध्ये गेल्या 16 मोसमापासून खेळताहेत ‘हे’ सात भारतीय खेळाडू,एकही हंगाम न चुकवल्याचा विक्रम झालाय त्यांच्या नावावर..!

आयपीएल मध्ये गेल्या 16 मोसमापासून खेळताहेत 'हे' सात भारतीय खेळाडू,एकही हंगाम न चुकवल्याचा विक्रम झालाय त्यांच्या नावावर..!

IPL Records: इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे सोळा मोसम यशस्वीरीत्या पार पडले आहेत. सतराव्या मोसमाला 22 मार्च पासून सुरुवात होतेय. बीसीसीआयकडून 21 सामन्याचे वेळापत्रक देखील घोषित केले आहे. पहिला सामना चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात रंगणार आहे. या लीग मध्ये सात असे भारतीय खेळाडू आहेत जे या लीगच्या सुरुवातीपासून खेळत आले आहेत, असा कारनामा इतर कोणत्याही खेळाडूला करता आला नाही.

1) रोहित शर्मा

भारताचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा हा या लीगच्या सुरुवातीपासून सर्वसामाने खेळत आला आहे. आयपीएलच्या इतिहासातील तो सर्वात यशस्वी कर्णधार आहे त्याच्याच नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलचा चषक पाच वेळा उंचावला होता. मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने त्याच्याकडून कर्णधार पदाची जबाबदारी काढून घेतली आहे. यंदा मुंबई इंडियन्स नेतृत्व हार्दिक पांड्या करताना दिसून येईल.

IPL 2024: अचानक मुंबई इंडियन्सने कर्णधार पदावरून काढल्यामुळे रोहित शर्माचे झालंय प्रचंड नुकसान, हे 7 विक्रम आता रोहित कधीही नावावर करू शकणार नाही..

2) महेंद्रसिंग धोनी

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी हा सीएसके संघाचे नेतृत्व सांभाळतोय. 2008 पासून तो इंडियन प्रीमियर लीग मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळतोय. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली कर्णधार म्हणून त्याची गणना होते. सीएसकेच्या संघाला त्याने पाच वेळा आईपीएलचे विजेतेपद पटकावून दिले आहे.

एकाच मैदानावर सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

3) मनीष पांडे

आयपीएलच्या इतिहासात पहिले शतक ठोकणारा भारतीय खेळाडू म्हणून मनीष पांडेला ओळखले जाते. आयपीएल मध्ये धडाकेबाज कामगिरी करून देखील त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी संधी भेटली नाही. एक उत्तम दर्जाचा तंत्रशुद्ध फलंदाज असून देखील ती मिळण्यातील वाढती स्पर्धेमुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 170 सामने खेळले असून त्यात त्याने 3808 धावा केल्या आहेत.

4) शिखर धवन

गब्बर’ या नावाने प्रसिद्ध असलेला सलामीचा फलंदाज शिखर धवन हा आयपीएलच्या प्रत्येक मोसमात खेळला आहे. यंदा तो किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व करताना दिसेल. आयपीएल मध्ये एकदाही पंजाबच्या संघाला विजेतेपद पटकावता आले नाही. त्याच्या अनुभवाचा फायदा पंजाब संघाला होऊ शकतो. 

आयपीएल मध्ये गेल्या 16 मोसमापासून खेळताहेत 'हे' सात भारतीय खेळाडू,एकही हंगाम न चुकवल्याचा विक्रम झालाय त्यांच्या नावावर..!

IND vs ENG: आर अश्विन म्हणजे शंभर नंबरी सोनं; क्रिकेटच्या 147 वर्षात अशी कामगिरी करणारा बनला पहिला गोलंदाज!

गब्बरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 217 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 35.38 च्या सरासरीने आणि 127.17 च्या स्ट्राइक रेटने 6,617 धावा केल्या आहेत. नाबाद 106 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. आयपीएल मध्ये त्याच्या नावे 2 शतके आणि 50 अर्धशतके आहेत. आगामी हंगामात 7,000 धावा पूर्ण करणारा तो दुसरा फलंदाज बनू शकतो. लीगमध्ये फक्त विराट कोहली (7,263) ने त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

5) दिनेश कार्तिक

यष्टीरक्षक फलंदाज कार्तिक IPL मधील सर्वोत्तम फिनिशर मानला जातो. यंदाच्या वर्षात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचे प्रतिनिधित्व करतोय. हे त्याचे कदाचित शेवटचे आयपीएलचे वर्ष असू शकते. 2008 तो पहिल्यांदा दिल्लीच्या संघाकडून खेळला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dinesh Karthik (@dk00019)

6) ऋद्धिमान साहा

यष्टिरक्षक फलंदाज ऋद्धिमान साहा आयपीएलच्या अंतिम सामन्यात शतक ठोकणारा पहिला खेळाडू आहे. 2008 पासून तो या लीग मध्ये खेळत आहे. रणजी क्रिकेटमध्ये बंगाल संघाचे प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू गुजरात टायटन संघाकडून यंदा खेळणार आहे.

7) विराट कोहली

रनमशीन, चेसमास्टर या नावाने प्रसिद्ध असलेल्या विराटने 2008 पासून बंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याने दीर्घकाळ या संघाचे नेतृत्वदेखील सांभाळले.

विराट कोहलीने गुरूग्राममधील स्वतःचे 12 ऑफिस भाड्याने दिले, घरबसल्या मिळणार एवढा किराया ;आकडा वाचून व्हाल हैराण..!

पण त्याला एकदाही त्याच्या संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देता आले नाही, हे शल्य त्याच्या मनात आजही कायम आहे. आतापर्यंत त्याने आयपीएल मध्ये 237 सामने खेळला असून 229 च्या स्ट्राइक रेटने 7,263 धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत एकूण 234 षटकार तर 643 चौकार मारले आहेत.

35 वर्षीय विराटने 2016 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध खेळताना त्याने अवघ्या 47 चेंडूत शतक ठोकले होते. 226 स्ट्राईक रेटने खेळताना 12 चौकार आणि 8 षट्काराच्या मदतीने 143 धावांची जबरदस्त खेळी केली होती.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 IPL 2024 : जाणून घ्या या IPL सिझन मध्ये कोणत्या संघात आहेत सर्वात धोकादायक आणि वेगवान गोलंदाज, वाचा सविस्तर

सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत या नवीन खेळाडूचा समावेश, रोहित शर्मा आणि विराट कोहली नंतर येतो त्याचा नंबर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *