आयपीएल 2024: आयपीएल 2024 स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदाच्या हंगामातला पहिला सामना 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि आरसीबीच्या संघामध्ये होणार आहे. चेन्नईची कमान महेंद्रसिंग धोनी तर आरसीबीचे नेतृत्व फॉफ डु प्लेसिस करत आहे. लीगमध्ये सामील झालेले शेकडो खेळाडू चषक जिंकण्यासाठी जीव तोडून मेहनत घेत आहेत तर दुसरीकडे ही लीग सुरू होण्यापूर्वीच पाच स्टार खेळाडू बाहेर पडले आहेत. या पाच मध्ये दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
1. मार्क वुड
इंग्लंडच्या स्टार वेगवान गोलंदाज मार्क वूड आयपीएल 2024 मधून बाहेर झाला आहे. लीग मध्ये तो लखनऊ सुपर जायंट्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. मार्क वूड हा इंग्लंडच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मध्ये सामील आहे. जून महिन्यामध्ये टी 20 वर्ल्ड कप होणार असल्यामुळे इंग्लंडने क्रिकेट बोर्डाने त्याला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परवानगी दिली नाही. विश्वचषकानंतर इंग्लंडला वेस्टइंडीज आणि श्रीलंका विरुद्ध मालिका खेळायची आहे. खेळाडूला कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये, यासाठी ईसीबीने त्याला खेळण्यास मंजुरी दिली नाही.
2. जेसन रॉय
मार्क वुड नंतर कोलकत्ता नाईट रायडर्स संघाचा महत्त्वाचा फलंदाज जेसन रॉय याने वैयक्तिक कारणामुळे आयपीएल 2024 मधून माघार घेतली आहे. केकेआर ने त्याला रिप्लेसमेंट म्हणून फील सॉल्ट याला दीड कोटी रुपये देऊन संघामध्ये सामील करून घेतले आहे. मागील वर्षी श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर त्याच्याजागी जेसन रॉय याला संधी दिली होती. त्याने आठ सामन्यामध्ये 285 धावा केल्या होत्या.
3. गस एटकिंसन
गस एटकिंसनने आयपीएल 2024 मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. वर्कलोड च्या कारणामुळे त्याने आयपीएल मधून माघार घेतली आहे. केकेआर ने त्याच्या जागी दुष्मंथा चमीरा याला संघात स्थान दिले आहे. चमीराने यापूर्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाचे प्रतिनिधित्व केले होते. आयपीएल 2023 मध्ये त्याने लखनऊ सुपर जायंट्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने 12 सामन्यात नऊ गडी बाद केले होते.
4. मोहम्मद शमी
गुजरात टायटन्स चा सर्वात खतरनाक वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएल 2024 मधून बाहेर पडला आहे. तो अद्यापही दुखापतीतून बाहेर पूर्णपणे बरा झाला नाही. नुकतेच शमीच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 2022-23 मध्ये गुजरात टायटन्स कडून खेळताना त्याने दमदार कामगिरी केली होती. गुजरात कडून खेळताना त्याने 48 विकेट स्वतःच्या नावे केले आहेत. शमीच्या जागेवर संघाने अजूनही त्याचा रिप्लेसमेंट म्हणून कोणत्याही खेळाडूला घेतले नाही.
5. प्रसिद्ध कृष्णा
मोहम्मद शमीनंतर आणखीन एक भारताचा वेगवान गोलंदाज आयपीएल 2024 मधून बाहेर पडला आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याचा स्नायू दुखावल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रणजी क्रिकेट खेळताना त्यालाही दुखापत झाली होती. मागील वर्षी देखील तो दुखापतीमुळे आयपीएलला मुकला होता. त्याची बेस्ट प्राईस ही एक कोटी रुपयाची होती. राजस्थान रॉयल्सच्या संघाने त्याला दहा कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. आयपीएलच्या आतापर्यंत खेळलेल्या 51 सामन्यात त्याने 49 गडी बाद करण्यात त्याला यश मिळाले.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
हे ही वाचा:- जगातील 10 क्रिकेटर जे लेट कट खेळण्यात आहेत तरबेज, भारतातील या खेळाडूंचा समावेश.
हे ही वाचा:- IPL 2024 RCB:- यंदा आयपीएल चॅम्पियन ट्रॉफी RCB कडे, हे 5 दिग्गज खेळाडू मिळवून देऊ शकतात RCB ला चॅम्पियन ट्रॉफी.