ईशान किशन ते रोहित शर्मा, दुहेरी शतक साजरे करण्यासाठी या 5 खेळाडूंनी खेळले एवढे चेंडू, एकाने तर ३ वेळा ठोकलेत दुहेरी शतक..
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक (200) करण्याचा विक्रम भारतीय यष्टिरक्षक फलंदाज इशान किशा याच्या नावावर जमा झाला आहे, त्याने शनिवारी डिसेंबर 2022 रोजी बांगलादेशविरुद्ध झहूर अहमद चौधरी स्टेडियम, चट्टोग्राम येथे केवळ 126 चेंडूंमध्ये द्विशतक केले. वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढत त्याने झिम्बाब्वेविरुद्ध मंगळवार 24 फेब्रुवारी 2015 रोजी मनुका ओव्हल, कॅनबेरा येथे केवळ 138 चेंडूंत द्विशतक झळकावले.
पहिले द्विशतक 24 फेब्रुवारी 2010 रोजी ग्वाल्हेर येथे दक्षिण आफ्रिकेच्या बलाढ्य संघाविरुद्ध भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरने झळकावले होते.
ईशान किशन: या यादीत आजच सर्वांत वर आलाय तो म्हणजे टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ‘ईशान किशन‘ त्याने केवळ 126 चेंडूत सर्वांत जलद दुहेरी शतक ठोकले आहे. आपल्या या खेळीत त्याने 210 धावा काढल्या आहेत.
View this post on Instagram
ख्रिस गेल: या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे तो म्हणजे वेस्ट इंडीजचा हार्ड हिटर फलंदाज ख्रिस गेल. गेलने सुद्धा दुहेरी शतक साजरे केले आहे. 2014 मध्ये झिम्बोम्ब्वे विरुद्ध गेलने केवळ 138 चेंडूत दुहेरी शतक ठोकले होते.
वीरेंद्र सेहवाग: गेलनंतर दुहेरी शतक ठोकणारा दुसरा फलंदाज आहे तो म्हणजे भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू सेहवाग. सेहवागने 2011 मध्ये इंदोर स्टेडियममध्ये 140 चेंडूत दुहेरी शतक साजरे केले होते. हा सामना वेस्ट इंडीज विरुद्ध खेळवण्यात आला होता. सेहवागने ताबडतोब फलंदाजी करत आपले पहिले दुहेरी शतक साजरे केले होते.
सचिन तेंडूलकर: सेहवागनंतर या यादीत नंबर लागतो तो मस्टर ब्लास्टर ‘सचिन तेंडुलकरचा. सचिनने आपले दुहेरी शतक साजरे करण्यासाठी 147 चेंडू खेळले होते. 2010 मध्ये ग्वालियर स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळतांना सचिनने हा पराक्रम केला होता. दकदक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजावर तुटून पडत सचिनने या खेळीत जबरदस्त फटकेबाजी केली होती.
View this post on Instagram
रोहित शर्मा: या यादीत आणखी एक दिग्गज नाव आहे ते म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा. रोहित शर्मा हा एकमेव खेळाडू आहे ज्याने 3 वेळा दुहेरी शतक झळकावले आहे. शिवाय सर्वांत मोठी वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रम सुद्धा रोहितच्याच नावावर आहे. रोहितने 2013,2014 आणि 2017 मध्ये ही कामगिरी केली होती. 2013 मध्ये त्याने ऑस्ट्रोलीयाविरुद्ध 256 चेंडूत दुहेरी शतक ठोकले होते. तर 2014 मध्ये कोलकत्तामध्ये श्रीलंकेविरुद्ध 151 चेंडूत दुहेरी शतक साजरे केले होते.
2013 आणि 2014 मध्ये ही कामगिरी केल्यानंतर 2017 मध्ये रोहितने पुन्हा एकदा दुहेरी शतक झळकावले होते. 2017 मध्ये मोहालीच्या मैदानावर पुन्हा श्रीलंकेविरुद्ध 151 चेंडूत दुहेरी शतक साजरे केले होते. अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित एकमेव असा खेळाडू आहे ज्याने 3 वेळा दुहेरी शतक ठोकले आहे.
हेही वाचा:
ईशान किशन पाठोपाठ विराट कोहलीनेही ठोकले ताबडतोब शतक, 44 व्या शतकासाठी विराट कोहलीने मोडले हे मोठे विक्रम..
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
व्हिडीओ प्लेलीस्ट :