एकदिवशीय विश्वचषकमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी ठोकलेत सर्वाधिक शतके, यादीमध्ये दिग्गज खेळाडूचाही समावेश..
एकदिवशीय विश्वचषक 2023 दोन दिवसापासून सुरु झाला आहे. या स्पर्धेत 10 संघ सहभागी आहेत. ज्यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग आहे. या खेळाडूंनी असेच काही अनोखे विक्रम केले आहेत. यापैकी काही फलंदाजांनी विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक शतके ठोकली आहेत. चला जाणून घेऊया अशा टॉप 4 खेळाडूंबद्दल,ज्यांनी एकदिवशीय विश्वकपमध्ये सर्वांत जास्त शतके ठोकले आहेत.
एकदिवशीय विश्वचषकमध्ये सर्वाधिक शतक करणारे 4 फलंदाज ( 4 player who scored more century’s in odi worldcup History)
1. रोहित शर्मा (Rohit Shamra)
या यादीत पहिले नाव भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचे(Rohit Shamra) आहे, ज्याने वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके झळकावली आहेत. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकावणारा तो जगातील चौथा आणि भारतातील एकमेव खेळाडू आहे. याशिवाय एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा रोहित शर्मा जगातील पहिला खेळाडू आहे. एकदिवशीय विश्वचषकाच्या 17 सामन्यात 6 शतके ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
2. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)
रोहित शर्मानंतर या यादीत दुसरे नाव भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचे (Sachin Tendulkar) आहे, ज्याने विश्वचषकात रोहित शर्माच्या बरोबरीने 6 शतके झळकावली आहेत. सचिन 1992 ते 2011 पर्यंत एकदिवसीय विश्वचषकाचा भाग होता. यादरम्यान त्याने 44 डावांमध्ये 6 शतके झळकावली आहेत. तो २०११ मध्ये वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघाचा सदस्य होता.सचिनने 6शतके साजरे करण्यासाठी रोहित पेक्षा जास्त सामने खेळले आहेत, ज्यामुळे सचिन या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
View this post on Instagram
3.कुमार संगकारा (Kumar Sanghkara)
या यादीत तिसरे नाव आहे श्रीलंकेचा माजी महान फलंदाज कुमार संगकाराचे (Kumar Sanghkara) , ज्याने विश्वचषकात एकूण 5 शतके झळकावली. संगकारा 2003 ते 2015 या कालावधीत एकदिवसीय विश्वचषकाचा भाग होता. यादरम्यान त्याने 35 डावांमध्ये 5 शतके झळकावली. श्रीलंकेकडून सर्वाधिक शतके ठोकणारा तो एकमेव खेळाडू आहे.
View this post on Instagram
4. रिकी पाँटिंग (Riki Ponting)
या यादीतील पुढचे नाव ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचे आहे, ज्याने वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक शतके झळकावली आहेत. एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर आहे.
Instagram पर यह पोस्ट देखें
त्याने 46 एकदिवसीय विश्वचषक सामन्यांमध्ये 5 शतके झळकावली आहेत. पाँटिंगने त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला दोन वनडे विश्वचषक जिंकून दिले आहेत. (player who hit most century in odi worldcup)
हेही वाचा: