विश्वचषक स्पर्धतील मानाचा समजला जाणारा ‘गोल्डन बॅट’ पुरस्कार आतापर्यंत या 3 भारतीय खेळाडूंना मिळालाय..
आपल्या भारतीय संघात उत्तम खेळाडूंची अजिबात कमी नाही. अनेक खेळाडूंनी क्रिकेट विश्वात भारतीय ध्वज उच्च शिखरावर पोहोचवला आहे. आपल्या कौशल्याने नवीन रेकॉर्ड आपल्या नावे केले आहे. यामुळे भारतीय संघाचा दरारा आणी संघाचा आदर क्रिकेट जगात निर्माण झाला.
आपण आयपीएल मध्ये ऑरेंज कॅप, गोल्डन कॅप इत्यादी कॅप पाहिल्या असेल. आयपीएलमध्ये जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करणाऱ्यांना हा किताब दिला जातो. अशाच प्रकारे क्रिकेटमध्ये असणाऱ्या सर्वोच्च स्पर्धेत म्हणजे वन डे विश्वचषक स्पर्धेत सुद्धा रोमांचक खेळाचे प्रदर्शन करणाऱ्यांना अनेक किताब दिले जातात. त्यामध्ये गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉल हे किताब म्हणजेच पुरस्कार महत्त्वाचे असतात.

वर्ल्डकप मध्ये सर्वाधिक रण काढणाऱ्या बॅट्समनला गोल्डन बॅट दिली जाते तर सर्वाधिक क्रिकेट चटकावणार्या बॉलरला गोल्डन बॉल दिला जातो. जगातील क्रिकेटर्समध्ये आतापर्यंत केवळ भारतीय संघाच्या खेळाडूंनी सर्वाधिक वेळा गोल्डन बॅट हा किताब जिंकलेला आहे. ते कोणते अव्वल दर्जाचे फलंदाज आहे ते आपण जाणून घेऊ.
सचिन तेंडुलकर:
गॉड ऑफ क्रिकेट समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचे नाव यामध्ये अग्रस्थानी घेतले जाते. 1996 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी सचिनने 7 सामन्यामध्ये 541 रन काढून गोल्डन बॅट आपल्या नावे केली होती. त्यामध्ये त्याने 2 शतक आणी तीन अर्धशतक जडवले होते. या स्पर्धेत भारतीय संघाच्या कोण्या खेळाडूंनी हा किताब जिंकणे ही पहिलीच वेळ होती. सर्वांना सार्थ अभिमान वाटला. त्याच सचिनने पुन्हा एकदा गोल्डन बॅट दुसर्या वर्ल्डकप मध्ये पटकावलेला आहे. म्हणजे सचिनच्या नावे दोनदा हा किताब पटकावल्याची नोंद आहे. आजही त्याच्या घरी त्या गोल्डन बॅट आपल्याला पाहायला मिळतात.
View this post on Instagram
राहुल द्रविड:
क्रिकेटच्या टेस्ट प्रकारामध्ये भारतीय संघाची भिंत म्हणून समजल्या जाणाऱ्या राहुल द्रवीड ने सुद्धा हा किताब आपल्या नावे केला आहे. यामध्ये राहुलने दोन शतक लगावले आणि चार अर्धशतक लगावले आहे. त्याचे 50 रन कधी पूर्ण व्हायचे हे कळायचे देखील नाही. यावेळी राहुलच्या बॅट मधून सर्वाधिक 145 धावा निघाल्या होत्या.
रोहित शर्मा:
रोहित शर्मा हे नाव सर्वांना अगदी सुपरिचित आहे. रोहित शर्माची खेळण्याची स्टाईल, त्याची क्षमता आणि मुख्य म्हणजे मैदानावरचा त्याचा शांत स्वभाव सर्वांनाच हवाहवासा वाटतो.रोहित ने तर वर्ल्ड कप मध्ये पाच शतक ठोकले आहे आणि सोबतच एक अर्धशतक त्याच्या बॅटमधून निघाले. 2019 साली ऑस्ट्रेलिया मध्ये झालेल्या या वर्ल्ड कप मध्ये रोहित ने 8 मॅचेस खेळून 648 रन्स आपल्या संघासाठी काढले.
हेही वाचा:
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..