World Cup 2023: यंदाच्या विश्वचषकामध्ये ‘हे’ 5 फलंदाज काढू शकतात सर्वांत जास्त धावा,एकजण तर आहे जबरदस्त फॉर्ममध्ये..!
क्रिकेटचा सर्वात मोठा महाकुंभ म्हणजेच विश्वचषक (ODI wolrdcup2023) 5 ऑक्टोबरपासून म्हणजेच उद्यापासून (गुरुवार)आपल्याच खेळवला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. या विश्वचषकात असे काही फलंदाज आहेत ज्यांच्या कामगिरीवर संपूर्ण जगाचे लक्ष असेल.
आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे अश्या 5 खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत. जे या विश्वचषकामध्ये सर्वांत जास्त धावा काढू शकतात, चला तर जाणून घेऊया नक्की कोण आहेत ते खेळाडू..
१- विराट कोहली (Virat Kohali)
भारतीय क्रिकेटचा सर्वात मोठा स्टार विराट कोहलीने ((Virat Kohali)) 2023 च्या आशिया कपमध्ये आपल्या फॉर्मचा पुरावा दिला आहे. विराटचे पाकिस्तानविरुद्धचे शतक वर्षानुवर्षे स्मरणात राहील. 34 वर्षीय विराट कोहलीचा हा शेवटचा विश्वचषकही असू शकतो. विराट विश्वचषकात शतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय आहे. किंग कोहलीने 2011 मध्ये हा विक्रम आपल्या नावावर केला होता. यंदाच्या विश्वचषकात सुद्धा विराट कोहलीवर सर्वांची नजर असणार आहे.
View this post on Instagram
२- बाबर आझम (Babar Azam)
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच्या सराव सामन्यांमध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपली शैली दाखवून दिली आहे. मात्र, बाबर पहिल्यांदाच भारतात आला आहे. अशा स्थितीत त्याची फलंदाजी पाहण्याची सर्वांनाच इच्छा होती. बाबरचा फॉर्म पाहता विश्वचषकात तो सहज तीन ते चार शतके झळकावू शकतो, असे सगळेच म्हणत आहेत.
३- रोहित शर्मा (Rohit Sharma)
गेल्या विश्वचषकाचा हिरो रोहित शर्मा यावेळीही चमत्कार करू शकतो. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या 2019 विश्वचषकात रोहितने पाच शतके झळकावून संपूर्ण जगाला चकित केले होते. यावेळीही टीम इंडियाचा कर्णधार भारतात खेळल्या जात असलेल्या विश्वचषकमध्ये जबरदस्त कामगिरी करून भारतीय चाहत्यांना विश्वचषक भेट देऊ शकतो. रोहितने विश्वचषकापूर्वीच आपण आक्रमक फलंदाजी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत त्याची फलंदाजी पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
4- स्टीव्ह स्मिथ (Steve smith)
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि वरिष्ठ फलंदाज स्टीव्ह स्मिथचाही हा शेवटचा विश्वचषक असू शकतो. या विश्वचषकात तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. गेल्या दोन विश्वचषकांमध्ये स्मिथ हा संघाच्या फलंदाजीतील महत्त्वाचा दुवा ठरला आहे. मात्र, यावेळी भारतामध्ये विश्वचषक खेळला जात असल्याने संघाला स्मिथची आणखी गरज आहे. स्मिथ भारतीय खेळपट्ट्यांवर सहज धावा करण्यात पटाईत आहे. तो वेगवान गोलंदाजांबरोबरच फिरकीपटूंनाही सहजतेने खेळतो. विश्वचषकात स्मिथच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

5- बेन स्टोक्स (Ben Stocks)
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी त्याच्या निवृत्तीवर यू-टर्न घेतला आहे. स्टोक्स या विश्वचषकात इंग्लंडसाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीही करू शकतो. त्याला भारतीय खेळपट्ट्या जवळून माहीत आहेत आणि तो खूप अनुभवीही आहे. या विश्वचषकात बेन स्टोक्सच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
तर मित्रांनो हे होते ते काही फलंदाज जे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करून जास्तीत जास्त धावा काढू शकतात. वरीलपैकी कोणता खेळाडू या विश्वचषकात सर्वांत जास्त धावा काढू शकतो, तुम्हाला काय वाटत कमेंट करून नक्की कळवा..
हेही वाचा: