हे आहेत आयपीएल मध्ये पहिला चेंडूवर षटकार मारणारे 5 जाबाज खेळाडू, यादीमध्ये एक विदेशी खेळाडूही सामील..

हे आहेत आयपीएल मध्ये पहिला चेंडूवर षटकार मारणारे 5 जाबाज खेळाडू, यादीमध्ये एक विदेशी खेळाडूही सामील..

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

====

आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग मध्ये क्रिकेट प्रेमींना आतापर्यंत चौकार षटकारांची आतिश बाजी पाहायला मिळाली आहे. गेल्या 16 हंगामामध्ये  आयपीएल मध्ये अनेक विक्रम रचले गेले. काही विक्रम मोडले गेले तर काही विक्रम अजूनही अबाधित आहेत. अशाच एका दुर्मिळ विक्रमावर आज आपण नजर टाकणार आहोत. आयपीएल मध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारे काही खेळाडू आहेत त्यांची माहिती आज आपण घेणार आहोत. विशेष म्हणजे या विक्रमाच्या यादीत एकमेव विदेशी खेळाडू आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते खेळाडू.

IPL RECORD: या खेळाडूंनी आयपीएलमध्ये पहिल्याच चेंडूवर ठोकलेत षटकार.

१.यशस्वी जयस्वाल

राजस्थान रॉयल्सचा सलामीचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल याची आतापर्यंतची क्रिकेट कारकीर्द जबरदस्त आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाका करणाऱ्या या खेळाडूनं आयपीएलमध्ये देखील आपल्या बॅटचा जलवा दाखवला आहे. आयपीएलमध्ये पहिल्याच चेंडूवर दोनदा षटकार ठोकण्याचा पराक्रम त्याने केला आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. सध्या तो जबरदस्त फॉर्मत आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये त्याने सातशेहून अधिक धावा काढल्या आहेत. त्याचा हा परफॉर्मन्स आयपीएल मध्ये कायम राहिला तर यंदाच्या स्पर्धेत देखील राजस्थानला विजयापासून कोणीच रोखू शकणार नाही.

२. मयंक अग्रवाल

पंजाब किंग्स संघाचा प्रमुख फलंदाज मयंक अग्रवाल याच्या देखील नावावर  हा विक्रम आहे. आपल्या फलंदाजीच्या शैलीत बराच बदल केलेल्या मयंक अग्रवाल ने आयपीएल मध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याचा एकदा पराक्रम केला होता. मयंकने काही दिवस किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व केले होते. सध्या तो शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळतोय.

३. विराट कोहली

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

क्रिकेटमधील अनेक विक्रम स्वतःच्या नावावर करणारा विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मत आहे. आयपीएल मध्ये त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याचा विक्रम एकदा केला होता. नुकतेच त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 12000 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. तो 2009 पासून आरसीबीच्या संघात खेळतोय.

४.सुनील नरेन

‘मिस्ट्री स्पिनर’ सुनील नरेन  याने गोलंदाजी बरोबर फलंदाजीत असलेले कौशल्य दाखवून दिले आहे. तो गेला कित्येक वर्षापासून कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करतोय. आयपीएल मध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याचा विक्रम देखील त्याने केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्टइंडीज संघाकडून पदार्पण करणारा हा खेळाडू जगभरातील लीगमध्ये खेळतोय.

हे आहेत आयपीएल मध्ये पहिला चेंडूवर षटकार मारणारे 5 जाबाज खेळाडू, यादीमध्ये एक विदेशी खेळाडूही सामील..

५.नमन ओझा

यष्टीरक्षक फलंदाज नमन ओझा याने देखील आयपीएलमध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला होता. त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून आता निवृत्ती घेतली आहे. आयपीएलमध्ये त्याने राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण करणाऱ्या या खेळाडूला जास्त संधी मिळाली नसल्याने त्याला आपले कौशल्य दाखवता आले नाही. सध्या तो समालोचकाच्या भूमिकेत काम करतोय.

हे आहेत आयपीएल मध्ये पहिला चेंडूवर षटकार मारणारे 5 जाबाज खेळाडू, यादीमध्ये एक विदेशी खेळाडूही सामील..

६.रॉबिन उथप्पा

स्टायलिश फलंदाज रॉबिन उथप्पा ने आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकत्ता नाईट रायडर्स या संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. आयपीएल मध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. (players who hit six on first ball in ipl)


====

 

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *