या 7 दिग्गज वेगवान गोलंदाजांनी क्रिकेटमध्ये खेळलेत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय कसोटी सामने, यादीमधील दुसरे नाव सर्वांत आच्छर्यकारक..!

या 7 दिग्गज वेगवान गोलंदाजांनी क्रिकेटमध्ये खेळलेत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय कसोटी सामने, यादीमधील दुसरे नाव सर्वांत आच्छर्यकारक..!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

Players Who played most international test:  कसोटी क्रिकेट खेळणे वेगवान गोलंदाजासाठी आव्हानात्मक काम आहे. फॉर्म आणि फिटनेस राखून कसोटी क्रिकेट मधला प्रवास सुरू ठेवणे ही गोष्ट वेगवान गोलंदाजांसाठी वाटते तितकी सोपी नाहीये. आज आम्ही तुम्हाला क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंची माहिती देणार आहोत.

Players Who played most international test: या खेळाडूंनी खेळलेत सर्वाधिक अंतरराष्ट्रीय कसोटी सामने.

1.जेम्स अँडरसन

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने कसोटी क्रिकेटमध्ये 187 कसोटी सामने खेळला आहे. नुकतेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 700 विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा तो पहिला वेगवान गोलंदाज आहे.

2003 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये 200 सामने खेळले होते. त्याचा विक्रम मोडीत करण्यासाठी अजून त्याला 14 कसोटी सामने खेळण्याची गरज आहे.

2.स्टुअर्ट ब्रॉड

या 7 दिग्गज वेगवान गोलंदाजांनी क्रिकेटमध्ये खेळलेत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय कसोटी सामने, यादीमधील दुसरे नाव सर्वांत आच्छर्यकारक..!

जेम्स अँडरसन याचा साथीदार स्टुअर्ट ब्रॉड याने क्रिकेटमध्ये 167 कसोटी सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा तो जगातला दुसरा खेळाडू ठरला आहे. इंग्लंडच्या या वेगवान गोलंदाजाने 604 बळी बाद करण्याचा पराक्रम केला होता. 15 धावा देत आठ बळी बाद करण्याची ही त्याची सर्वोच्च कामगिरी ठरली. गतवर्षी त्याने कसोटी क्रिकेटला राम राम ठोकला.2007 टी 20 क्रिकेटमध्ये त्याच्या एका षटकात युवराज सिंगने सहा षटकार ठोकले होते.

3. कर्टनी वॉल्श

वेस्टइंडीजचे माजी वेगवान गोलंदाज कर्टनी वॉल्श यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 500 हून अधिक बळी घेण्याचा पहिल्यांदा पराक्रम केला होता. त्यांनी 132 कोटी सामन्यात 519 पळी घेतले होते. 90 च्या दशकात त्यांनी आपल्या धारदार गोलंदाजीने भल्याभल्या दिग्गज फलंदाजाची बोलती बंद केली होती. 

या 7 दिग्गज वेगवान गोलंदाजांनी क्रिकेटमध्ये खेळलेत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय कसोटी सामने, यादीमधील दुसरे नाव सर्वांत आच्छर्यकारक..!

4.ग्लेन मॅग्राथ

वेस्टइंडीजचे माजी वेगवान गोलंदाज कर्टनी वॉल्श यांचा कसोटी क्रिकेटमधला 500 हून अधिक बळी घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅग्राथ याने मोडीत काढला होता. 1993 ते 2007 या कालावधीत त्याने 124 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळला होता. यात त्याला 563 विकेट घेण्यात यश मिळाले. 24 धावा देत आठ गडी बाद करण्याचा पराक्रम त्याने केला होता.

5. डेल स्टेन

दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने 93 कसोटी सामन्यात 439 बळी घेतले होते. 2004 ते 2019 पर्यंत पंधरा वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या धारदार गोलंदाजीने धाक निर्माण केला होता. फिटनेसमुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्य ठेवता आले नाही. अखेर दुखापतीमुळे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम ठोकला.

या 7 दिग्गज वेगवान गोलंदाजांनी क्रिकेटमध्ये खेळलेत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय कसोटी सामने, यादीमधील दुसरे नाव सर्वांत आच्छर्यकारक..!

6.कपिल देव

भारताचे माजी दिग्गज गोलंदाज कपिल देव यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 131 सामने खेळले असून त्यात त्यांनी 434 बळी मिळवले होते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा त्यांचा हा विक्रम दीर्घकाळ होता. 1978 साली त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 1994 मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. 51 धावा देत सात बळी ही त्यांची सर्वोच्च कामगिरी होती.

7.सर रिचर्ड हेडली

सर रिचर्ड हेडली यांनी 1973 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली होती. 86 आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये 431 विकेट बाद केले होते. कसोटी क्रिकेट मधील सर्वाधिक विकेट घेण्याचा त्यांचा पहिल्यांदा विक्रम कपिल देव यांनी मोडला.


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *