भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना २९ जानेवारी रोजी पार पडणार आहे. रांचीच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाला २१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासाठी दुसरा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. नाहीतर भारतीय संघाला ही मालिका गमवावी लागू शकते. त्यामुळे दुसऱ्या टी -२० सामन्यात हार्दिक पंड्या आपल्या प्लेइंग ११ मध्ये काही महत्वाचे बदल करू शकतो.
दुसऱ्या टी -२० सामन्यात हे असतील सलामीवीर फलंदाज..
दुसऱ्या टी -२० सामन्यात शुभमन गिल सोबत विस्फोटक फलंदाज पृथ्वी शॉला संधी दिली जाऊ शकते. शुभमन गिलने वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली होती. मात्र त्याला पहिल्या टी -२० सामन्यात हवी तशी कामगिरी करता आली नाही. तो स्वस्तात माघारी परतला होता. तर पृथ्वी शॉ अनेक महिन्यांची प्रतीक्षा केल्यानंतर मैदानात उतरेल. त्यामुळे तो देखील चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
मधल्या फळीत या फलंदाजांना मिळू शकते संधी..
दुसऱ्या टी -२० सामन्यात ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो. त्यामुळे राहुल त्रिपाठीला विश्रांती दिली जाऊ शकते. राहुल त्रिपाठीला पहिल्या टी -२० सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र तो दबावात येऊन शून्यावर बाद झाला.
तसेच चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव फलंदाजीला येऊ शकतो. पाचव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या, सहाव्या क्रमांकावर दीपक हुड्डा, सातव्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुदंर फलंदाजीला येऊ शकतो.

या गोलंदाजांना मिळू शकते संधी..
या सामन्यात हार्दिक पंड्या एकमेव फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संधी देऊ शकतो. तर वेगवान गोलंदाज मुकेश कुमार, उमरान मलिक, शिवम मावी यांना संधी देऊ शकतो. गेल्या सामन्यात महागड्या ठरलेल्या अर्शदीप सिंगला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
अशी असू शकते प्लेइंग ११ :
पृथ्वी शॉ, शुभमन गिल, ईशान किशन ( यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुदंर, कुलदीप यादव, शिवम मावी, उमरान मलिक, मुकेश कुमार.
हे ही वाचा..
BCCI चा मोठा खुलासा! ईशान किशन, केएस भरत नव्हे तर कसोटी संघात ‘हा’ खेळाडू घेणार रिषभ पंतची जागा