पोलिस अधिकाऱ्यांची प्रतिमा सर्वसामान्यांच्या नजरेत तशी फारशी चांगली नाही. पण सध्याच्या काळात नकारात्मकतेनंतर सकारात्मकताही पाहायला मिळत आहे. दरम्यान, पोलिस कर्मचाऱ्याच्या चांगल्या मनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्याने लोकांची मने जिंकली आहेत. या पोलीस अधिकार्याने काही असे काम केले आहे जे पाहून लोक त्यांची स्तुती करतांना थकत नाहीयेत. नक्की काय केलंय त्यांनी पाहूया या विशेष लेखाच्या माध्यमातून…
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे .ज्यामध्ये एक पोलीस कर्मचारी एका निराधार मुलाला कशी मदत करत आहे हे दिसत आहे. व्हिडिओमध्ये एका मुलाचे कपडे फाटलेले असून त्याच्या पायात चप्पल नसल्याचे दिसून येते. मुलाला पाहताच एका पोलिसाने त्याला आधी पाणी प्यायला दिले आणि नंतर नवीन चप्पल घालायला लावली. त्यानंतर त्याला नवीन कपडेही देण्यात आले. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय आणि तो लोकांच्या पसंडीत पडत आहे..
माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्याच्या व्हिडिओला लाखो लाईक्स मिळाले आहेत.
पोलिस कर्मचाऱ्याच्या चांगल्या मनाचा हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @abhaygiri21 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने व्हिडिओ शेअर करताच हा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला. आतापर्यंत या व्हायरल व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि लाखो लाईक्स मिळाले आहेत.
पहा व्हिडीओ.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या औदार्याचा व्हिडिओ समोर आला होता ज्यात एका वृद्धाची डाळीची पोती रस्त्यावर पडून फुटली होती. अशा परिस्थितीत रस्त्यावर पडलेली डाळ उचलण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने एका वृद्धाला मदत करून लोकांची मने जिंकली होती. त्यानंतर काही दिवसातच आता पुन्हा हा व्हिडीओ व्हायरल झाल्या नंतर लोकांमध्ये पोलिसांची इमेज चांगली व्हायला लागली आहे..
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर
- .अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
- पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी