आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताचा आठवा सामना दक्षिण आफ्रिके विरुद्ध होणार आहे. 5 नोव्हेंबर रोजी कोलकत्याच्या मैदानावर दोन्ही संघ आमने-सामने भिडतील. हा सामना ऐतिहासिक कोलकत्ता क्रिकेट संघटने कडून तयारी सुरू झाली आहे. पाच नोव्हेंबर रोजी विराट कोहली याचा वाढदिवस आहे त्याच्या वाढदिवसासाठीमोठी तयारी सुरू झाली आहे. विराटच्या जन्मदिनी त्याचा एक मोठा सन्मान म्हणून ही तयारी सुरू आहे.
कोलकत्ता क्रिकेट स्टेडियमवर जवळपास 70 हजार दशक हा सामना पाहण्यासाठी येणार आहेत. मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरलेले दिसणार आहे. सामन्याची तिकिटे यापूर्वीच विकली गेली आहेत. कॅबकडून विराट कोहलीच्या चेहऱ्याचे 70 हजार मुखवट्याचे वाटप होणार आहे. 70 हजार प्रेक्षकांना कोलकत्ता क्रिकेट संघटनेकडून हा मुखवटा मोफत दिला जाणार आहे. प्रेक्षकांना स्टेडियम मध्ये प्रवेश देण्यापूर्वीच हा मुखवटा घालून त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
सामना सुरू होण्यापूर्वी कोलकत्ता क्रिकेट संघटनेकडून केक कापून विराट कोहलीचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. तसेच त्याला संघटनेकडून एक स्मृतिचिन्ह देऊन त्याचा गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी आयसीसीची परवानगी घ्यावी लागणार आहे.
कोलकत्ता राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली बोलताना म्हणाले की, या खास कार्यक्रमासाठी आयसीसीची परवानगी घ्यावी लागणार आहे आणि आम्हाला परवानगी मिळेल याची खात्री आहे. प्रेक्षक मैदानात येतानाच कोहलीच्या चेहऱ्याचे मुखवटे घालूनच स्टेडियम मध्ये येतील.
नोव्हेंबर 2013 मध्ये कॅबने सचिन तेंडुलकरच्या 199 कसोटी सामन्याच्या वेळी सचिन तेंडुलकरच्या चेहऱ्याचे मुखवट्याचे वाटप प्रेक्षकांना केले होते. विराट कोहली साठी देखील हा दिवस अविस्मरणीय ठरणार आहे.
विराट कोहली यंदाच्या आयसीसी स्पर्धेमध्ये प्रचंड फॉर्मत आहे. त्याने सहा सामन्यात 354 धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सामने वगळता इतर सर्वच सामन्यात त्याने छाप सोडली आहे. विराट कोहली कडून देखील त्याच्या वाढदिवसा दिवशी एका मोठ्या खेळीची अपेक्षा सर्वच क्रिकेट प्रेमींकडून केली जात आहे.
भारतीय क्रिकेट संघाला आयसीसी विश्वचषक 2023 च्या विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारतीय क्रिकेट संघाने देखील तशी नावाला लौकिक कामगिरी या विश्वचषक स्पर्धेमध्ये करून दाखवली आहे. भारताने त्यांचे सुरुवातीचे सलग सहा सामने जिंकून गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोचले आहे. भारताचा पुढचा सामना 2 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.