पृथ्वी शॉ च्या अडचणीमध्ये वाढ, सपना गिल ची मुंबई हायकोर्ट मध्ये धाव
सध्या आयपीएल चा हंगाम सुरू असल्याने सर्व संघ आपले आपले खेळाडू घेऊन सज्ज आहेत जव की त्यांची ही तयारी ट्रॉफी साठी असल्याचे दिसत आहे. मात्र अशातच सध्या एका खेळाडूच्या अडचणी वाढलेल्या दिसत आहेत. दिल्ली कॅपिटल मधील युवा आणि स्टार असा अनुभवी खेळाडू पृथ्वी शॉ सध्या अडचणीमध्ये सापडला आहे.

मागील दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडिया इन्फ्लुसंर सपना गिल सोबत झालेल्या वादामुळे आता तीच सपना गिल मुंबई हायकोर्टमध्ये पोहचली आहे. सपना गिल ने अंधेरी मजिस्ट्रेट मध्ये पृथ्वी शॉ व त्याच्या काही मित्रांविरुद्ध केस दाखल केली आहे.
सपना गिल ची पोलीस स्टेशनमध्ये धाव :-
सोशल मीडिया इन्फ्लुसंर सपना गिल हिने पृथ्वी शॉ या भारतीय संघाच्या खेळाडूवर असे आरोप केले आहेत जे की त्याने तिची छेडचाड केली नंतर तिला धक्का दिला आणि बॅट ने तिच्यावर हमला केल्याचे आरोप केले आहेत. सपना हे आरोप केल्यानंतर आईपीसी धारा ३५४, ५०९ आणि ३२४ याप्रकारे केस दाखल केली आहे.
सपना गिल जे वकील आहेत त्यांनी असे सांगितले आहे की एयरपोर्ट पोलिस स्टेशन विरुद्ध देखील तक्रार दाखल केली आहे. सपना गिल च्या माहितीनुसार ज्यावेळी हो सर्व घटना घडली त्यानंतर एयरपोर्ट पोलीस स्टेशन ने त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यास विरोध केला. सपना गिलच्या वकीलने सांगितले की पुढील सूनवाई १७ एप्रिल ला होईल.
सपना गिलला केले होते अरेस्ट :-
सूत्रांच्या माहितीनुसार असे समजले आहे की याआधी सुद्धा याच विषयामध्ये सपना गिल ला जेल मध्ये टाकले होते. १६ फेब्रुवारी रोजी ओशिवारा पोलीस ने सपना गिल ला मुंबई च्या नाइट क्लब बैरल मेंशन क्लब मध्ये पृथ्वी शॉवर हमला केला असल्याने तिला पोलिसांनी पकडून नेहले होते. पृथ्वी शॉ सोबत सेल्फी घेण्याबद्धल हा अरेस्ट चा मुद्धा होता.
ज्यावेळी ही घटना घडली त्यानंतर चार दिवसाने एका कोर्टाने सपना गिल आणि तीन लोकांना जामीनावर सोडले. जे की हे तीन शॉ वर मारपिट आणि त्यांच्या कार वर बेसबॉल च्या स्टिक ने हल्ला केल्याचा आरोप केला. सध्या पृथ्वी शॉ दिल्ली कॅपिटल या संघात खेळत आहेत. सध्या तरी पृथ्वी ची बॅटिंग चालली नाही आणि अजून त्याने रन्स सुद्धा केल्या नाहीत.