टीम इंडियामधून बाहेर असलेला पृथ्वी विजय हजारे ट्रॉफीमध्ये धुमाकूळ घालतोय..
वर्ल्डकप 2023 संपल्यानंतर आता भारतीय संघातील न्यूझीलंड दौर्यावर न गेलेले खेळाडू घरेलू स्पर्धा खेळताना दिसत आहेत. भारतीय संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ सुद्धा घरेलू स्पर्धेत खेळत आहे. आधी दिलीप ट्रॉफी, नंतर सैय्यद मुश्ताज अली ट्रॉफी आणि आता विजय हजारे चषकमध्ये पृथ्वी शॉने जबरदस्त फलंदाजी करत लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने काढलेल्या जबरदस्त धावा पाहता त्याने पुन्हा एकदा भारतीय संघाचा दरवाजा ठोठावल्याच्या गोष्टी बोलल्या जात होत्या. आणि आता पुन्हा विजय हजारे ट्रॉफीमध्ये सुद्धा पृथ्वी त्याच पद्धतीने स्फोटक फलंदाजी करतोय. विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात पृथ्वीने जबरदस्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करत अर्धशतक ठोकलय.
View this post on Instagram
मिजोरम विरुद्ध झालेल्या या सामन्यात अजिंक्य राहणेच्या नेतृत्वात मुंबईकडून खेळतांना पृथ्वीने पहिल्याच सामन्यात मुंबईला मोठा विजय मिळवून दिला.
या सामन्यात नाणेफेक जिंकून मिजोरमचा कर्णधार तरुवर कोहलीने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचा हा निर्णय मिजोरमच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवला. मुंबईच्या गोलंदाजासमोर त्यांचा एकही खेळाडू जास्त वेळ मैदानावर तग धरू शकला नाही.
मिजोरम कडून यष्टीरक्षक श्रीवत्स गोस्वामीने 56 धावा काढून महत्वाची खेळी खेळली. त्यांतर मात्र एकही खेळाडू मुंबईच्या गोलंदाजांचे आक्रमण झेलू शकला नाही. मिजोरमचा संघ केवळ 188 धावा काढून सर्वबाद झाला.
त्यानंतर प्रत्युतरात मुंबईच्या सलामीवीर फलंदाजांनी सावध सुरवात करत चांगली कामगिरी केली.नंतर मात्र एकदा मैदानावर सेटल झाल्यावर सलामीवर पृथ्वीने 50 षटकाच्या या सामन्याला केवळ 20 षटकाचा सामना बनवून टाकले.
मैदानाच्या चारी बाजूने फटके मारत पृथ्वीने अक्षरशा मिजोरमच्या गोलंदाजांची कुटाई केली. यादरम्यान फक्त 35 चेंडू खेळून पृथ्वीने आपले अर्धशतक साजरे केले. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने हा सामना केवळ 22 षटकातच जिंकला..

लागोपाठ चांगल्या खेळ्या करून पृथ्वी ठोठावतोय टीम इंडियाचे दार..!
आधी सैयद मुस्ताक अली आणि आंता विजय हजारे ट्रॉफी दोन्हीही जागी पृथ्वी जबरदस्त फोर्ममध्ये दिसून येतोय.त्याच्या या जबरदस्त प्रदर्शनाने तो एक प्रकारे टीम इंडियात पुनरागमन करण्याचा त्याचा इरादा स्पष्ट करतोय. टीम इंडियाच्या एकदम जवळ येऊन पोहचलेला पृथ्वी त्याचा फोर्म कायम ठेवून निवड कर्त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने आतापर्यंत 2 सामन्यात 117 धावा ठोकल्या आहेत.
टीम इंडियासाठी पृथ्वीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झाले तर त्याने आतापर्यंत इंडियासाठी 5 कसोटी, ३ एकदिवशीय आणि एक ट्वेंटी-ट्वेंटी सामना खेळला आहे. आयपीएलमधेही त्याने आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घातला होता. पृथ्वीचा हा फोर्म पाहता तो लवकरच टीम इंडियात थाटामाटाने पुनरागमन करू शकतो.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..