World cup 2023: ‘बॅक टू बॅक’ शतक ठोकण्याच्या यादीत क्विंटन डीकॉक झाला सामील; डबल धमाका करण्यात दोन भारतीय खेळाडू

'बॅक टू बॅक' शतक ठोकण्याच्या यादीत क्विंटन डीकॉक झाला सामील: डबल धमाका करण्यात दोन भारतीय खेळाडू

‘बॅक टू बॅक’ शतक ठोकण्याच्या यादीत क्विंटन डीकॉक झाला सामील: डबल धमाका करण्यात दोन भारतीय खेळाडू


 World cup 2023: लखनऊ येथे झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 134 धावांनी पराभव केला. यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डिकॉक याच्या शानदार शतकी खेळाच्या जोरावर आफ्रिकेने सलग दुसरा विजय मिळवला. डिकॉकचे हे या विश्वचषकातील ( World cup 2023:) सलग दुसरे शतक ठरले. त्याने 106 चेंडूत 109 धावा केल्या यात आठ चौकार आणि पाच उत्तुंग षटकारांचा समावेश होता. यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने 84 चेंडूत 100 धावांची वादळी खेळी केली केली होती. या शतकासह तो सलग दोन सामन्यात शतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. 

या यादीत पहिल्या स्थानावर श्रीलंकेचा माजी कर्णधार यष्टिरक्षक फलंदाज कुमार संघकारा पहिल्या स्थानावर आहे. त्याने 2015 साली झालेल्या विश्वचषकात बांगलादेश विरुद्ध, 105 इंग्लंड विरुद्ध 117, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 110 स्कॉटलंड विरुद्ध 124 धावांची खेळी केली होती. विश्वचषकात ( World cup 2023) सलग चार शतके करण्याचा हा विक्रम आजही अबाधित आहे.

World Cup[ 2023: 'विश्वचषकात टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवणं ही अभिमानाची गोष्ट' वर्ल्डकपच्या एकदिवस आधी रोहित शर्माने देशाबद्दल केले मोठे वक्तव्य..

 

2019 साली इंग्लंड मध्ये झालेल्या विश्वचषकात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने सलग तीन सामन्यात तीन शतक ठोकले होते. इंग्लंड विरुद्ध 102, बांगलादेश विरुद्ध 104 आणि श्रीलंकेविरुद्ध 103 धावांची तडाखेबाज खेळी केली होती. श्रीलंकेच्या कुमार संघाकाराचा सलग चार शतक ठोकण्याचा विक्रम मोडण्याची संधी रोहित शर्माला आली होती. मात्र ती थोडक्यात हुकली.

1996 साली भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या मार्क वॉर्नने सलग सामन्यात दोन शतक ठोकले होते. केनियाविरुद्ध 130 तर भारताविरुद्ध 126 धावांची शानदार खेळ केली होती. हा विश्वाचषक श्रीलंकेने जिंकला होता.

इंग्लंडमध्ये 1999 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा माझी कर्णधार राहुल द्रविड याने दोन शतके ठोकली होती त्याने केनियाविरुद्ध 104 तर श्रीलंकेविरुद्ध 145 धावांची खेळी केली होती. याच विश्वचषकात पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज सईद अनवर याने झिंबाब्वे विरुद्ध 103 तर न्यूझीलंडविरुद्ध 113 धावांची सुरेख खेळ केली होती. या विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाने आपले नाव कोरले होते.

'बॅक टू बॅक' शतक ठोकण्याच्या यादीत क्विंटन डीकॉक झाला सामील: डबल धमाका करण्यात दोन भारतीय खेळाडू

2007 साली ऑस्ट्रेलियाचा माजी स्फोटक फलंदाज मॅथ्यू हेडन याने दक्षिण आफ्रिके विरुद्ध 101 तर वेस्ट इंडिज विरुद्ध 158 धावांची जिगरबाज खेळी केली होती.

वेस्टइंडीज मध्ये झालेल्या या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला नमवून विश्वचषक जिंकण्याची हॅट्रिक नोंदवली होती.

2003 साली विश्वचषकाच्या झालेल्या अंतिम सामन्यात रिकी पॉंटिंग याने शतक ठोकले होते तर 2007 च्या विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात पॉंटिंगने शतक ठोकत सलग दोन सामन्यात शतक ठोकण्याचा पराक्रम केला. पॉंटिंगच्या या तडाखेबाज खेळीमुळे टीम इंडियाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. 2011 साली क्रिकेट 360 म्हणून प्रसिद्ध असलेल्या एबी डिव्हिलियर्स याने वेस्ट इंडिज विरुद्ध 107 तर नेदरलँडविरुद्ध 134 धावांची शतकी खेळी केली.

'बॅक टू बॅक' शतक ठोकण्याच्या यादीत क्विंटन डीकॉक झाला सामील: डबल धमाका करण्यात दोन भारतीय खेळाडू

सन 2015 मध्ये बांगलादेशी फलंदाज महंमदुल्ला याने इंग्लंडविरुद्ध 103 तर न्यूझीलंडविरुद्ध 128 धावांची खेळी केली. तसेच न्यूझीलंडचा सलामवीर मार्टिन गप्टिल याने बांगलादेश विरुद्ध 105 तर वेस्ट इंडिज विरुद्ध 267 धावांची सर्वोत्तम शतकी खेळी केली. सदरच्या स्पर्धेत न्यूझीलंडला हरवून ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले होते.

2019 च्या विश्वचषकात केन विल्यम्सनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 106 तर वेस्ट इंडिज विरुद्ध 148 धावांची शानदार खेळी केली. याच विश्वचषकात इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जॉनी ब्रेस्टो याने भारताविरुद्ध 111 तर न्यूझीलंड विरुद्ध 106 धावांची ताबडतोब शतकी खेळी केली होती. हा विश्वचषक इंग्लंडने आपल्या नावावर केला होता.


हेही वाचा:

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत