क्विंटन डी कॉक: न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका (NZ vs SA) यांच्यात विश्वचषक स्पर्धेतील 32 वा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात न्यूझीलंडचा 190 धावांनी पराभव करत एकतर्फी विजय मिळवला. सुपर फॉर्मात असलेला सलामीचा फलंदाज क्विंटन डी कॉक याने या विश्वचषक स्पर्धेत इतिहास रचला आहे.
एकाच विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पहिला फलंदाज ठरला आहे. डी कॉकच्या पूर्वी हा विक्रम अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलीस याच्या नावावर होता. दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना एकाच विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक 485 धावा केल्या होत्या. 2007 च्या विश्वचषकातील नऊ सामन्यात त्याने 485 धावा केल्या होत्या. त्याचा हा विक्रम नुकतेच डी कॉकने मोडून काढला आहे.
यंदाच्या स्पर्धेत त्याने एकूण चार शतके ठोकली आहेत. बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हे त्याने दमदार शतकी खेळी केली. या सामन्यात त्याने 116 चेंडूत 114 धावांची खेळी केली. यात दहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. या शतकासह त्याने एकाच विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक चार शतके ठोकण्याचा कुमार संघकारा याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
क्विंटन डिकॉक ने 2023 विश्वचषकात आतापर्यंत चार शतके ठोकली आहेत. एकाच विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहित शर्माने एकाच स्पर्धेत सर्वाधिक पाच शतके ठोकली आहेत. क्विंटन डिकॉकने पुढच्या सामन्यात शतक ठोकले तर तो रोहितच्या विक्रमाशी बरोबरी करू शकेल.
या सामन्यात विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेचा संघ विश्वचषक स्पर्धेच्या गुणतालिकेत टॉपवर पोहोचला आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 4 बाद 357 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात डोंगराएवढ्या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 35.3 षटकात 167 धावांवर आटोपला.
एकाच विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा करणारे पाच फलंदाज:
500* – क्विंटन डी कॉक – 7 डाव – 2023
485 – जॅक कॅलिस – 9 डाव – 2007
482 – एबी डिव्हिलियर्स – 7 डाव – 2015
443 – ग्रॅम स्मिथ – 10 डाव – 2007
410 – पीटर कर्स्टन – आठ डाव – 1992
हेही वाचा:
विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..