भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विन याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात हळद ४५० गडी बाद करण्याच्या बाबतीत अनेक दिग्गज खेळाडूंना मागे सोडलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ४५० गडी बाद करणारा तो केवळ दुसराच गोलंदाज ठरला आहे.
भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात अश्विनने हा कारनामा केला आहे. या सामन्यात पहिला गडी बाद करताच त्याच्या नावे या मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. हा कसोटी सामना खेळण्यापुर्वी अश्विनने ८८ कसोटी सामन्यांमध्ये २४.३० च्या सरासरीने ४४९ गडी बाद केले होते. तर ॲलेक्स कॅरी हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ४५० वा विकेट ठरला आहे.
यासह आर अश्विनने दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेचा विक्रम मोडून काढला आहे. अनिल कुंबळे यांनी ९३ सामन्यांमध्ये ४५० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. तर मुरलीधरनने आपल्या ८० व्या सामन्यात ४५० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ४५० गडी बाद करणारे गोलंदाज..
मुथय्या मुरलीधरन: ८० कसोटी
आर अश्विन :८९ कसोटी
अनिल कुंबळे:९३ कसोटी
ग्लेन मॅ्कग्रा : १०० कसोटी
शेन वॉर्न :१०१ कसोटी
नॅथन लायन : ११२ कसोटी
हे ही वाचा…