येत्या ९ फेब्रुवारी पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. या मालिकेत आर अश्विनकडे अनिल कुंबळेचा मोठा विक्रम मोडण्याची संधी असणार आहे. हा विक्रम मोडत तो मुथय्या मुरलीधरनच्या खास क्लबमध्ये प्रवेश मिळवू शकतो. अनिल कुंबळेचा विक्रम मोडून आर अश्विन मुथय्या मुरलीधरन नंतर सर्वात जलद ४५० गडी बाद करण्याचा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. या मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपूरच्या मैदानावर पार पडणार आहे.
आर अश्विनने आतापर्यंत खेळलेल्या ८८ सामन्यांमध्ये २४.३० च्या सरासरीने ४४९ गडी बाद केले आहेत. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेतील पहिल्याच सामन्यात एक गडी बाद करताच कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या ४५० विकेट्स पूर्ण होतील. हा विक्रम त्याला ८९ व्या सामन्यात पूर्ण करण्याची संधी असणार आहे. यापूर्वी मुथय्या मुरलीधरनने ८० व्या सामन्यात ४५० गडी बाद केले होते. तर अनिल कुंबळेने ९३ व्या कसोटी सामन्यात ४५० गडी बाद केले होते.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ४५० गडी बाद करणारे गोलंदाज…
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका )- ८० कसोटी सामन्यात
अनिल कुंबळे (भारत ) – ९३ कसोटी सामन्यात
ग्लेन मॅग्रा (ऑस्ट्रेलिया )- १०० कसोटी सामन्यात
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया ) – १०१ कसोटी सामन्यात
नाथन लायन (ऑस्ट्रेलिया ) – ११२ कसोटी सामन्यात
हे ही वाचा..
रणजी ट्रॉफी स्पर्धेत रोहितची आक्रमक खेळी! ६४ चौकार अन् ६ षटकारांच्या मदतीने ठोकल्या ५७५ धावा..